अकरावी सीईटीसाठी पहिल्या दिवशी एक लाख अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:13+5:302021-07-21T04:10:13+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे निश्चित करण्यात आले. ही परीक्षा ऐच्छिक असली तरी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे निश्चित करण्यात आले. ही परीक्षा ऐच्छिक असली तरी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे राज्यभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता शहरी भागातील अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राज्य मंडळासह सीबीएसई व इतर बोर्डाचे विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु, अद्याप या बोर्डाचा निकाल जाहीर झालेला नाही. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सीईटीसाठी अर्ज भरण्याची संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यामुळे राज्य मंडळाकडून सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली जाऊ शकते,असे बोलले जात आहे.
---------
अकरावी प्रवेश पूर्व परीक्षे संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रिया शिंदे यांच्याशी ९६८९१९२८९९ तर संगीता शिंदे यांच्याशी ८८८८३३९५३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.