मार्तंड कोविड केयर सेंटरला आमदारांकडून एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:24+5:302021-05-12T04:12:24+5:30
सोमवारी आमदार निम्हण यांनी जेजुरी कोविड सेंटरला भेट दिली होती. या वेळी त्यांनी देवसंस्थानच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त ...
सोमवारी आमदार निम्हण यांनी जेजुरी कोविड सेंटरला भेट दिली होती. या वेळी त्यांनी देवसंस्थानच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचार देताना सकस आहाराची गरज असते, असे निम्हण यांनी नमूद केले.
गेली १३ महिन्यांपासून देवसंस्थान समितीच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात विविध उपक्रम राबविले जात आहेत. गरजू व बेरोजगार नागरिकांना किराणा किटचे वाटप, आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना पीपीई किट वाटप, रुग्णवाहिका सेवा, गाव, शहर वाडीवस्तीवर जंतुनाशक फवारणी, औद्योगिक वसाहतीमधील बेरोजगार कामगारांना अन्नसेवा, ससून रुग्णालयाच्या आयसोल्यूशन वाॅर्डसाठी ५१ लक्ष रुपयांची मदत, तर गेली सात महिन्यांपासून जेजुरी येथे कोविड केयर सेंटर चालविण्यात येत आहे.
सध्या मंदिर बंद असल्याने उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, तसेच देवसंस्थानची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे विविध उपक्रमांसाठी भाविक भक्तांनी मदतीचा हात देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक भाविक, ग्रामस्थ, उद्योजक पुढे आले आहेत.
देवसंस्थानचे विश्वस्त -उद्योजक तुषार सहाणे यांनीही रुग्णांच्या अन्नसेवेसाठी ५१ हजार रुपयांची मदत केली आहे. काही जण स्वतःचा वाढदिवस साजरा करताना कोविड सेंटरमधील रुग्णांना अन्नसेवा देत आहेत.