माजी अध्यक्षांना एक लाखाचा निधी
By admin | Published: March 2, 2016 12:49 AM2016-03-02T00:49:45+5:302016-03-02T00:49:45+5:30
पिंपरी येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाहीर केल्याप्रमाणे मराठी साहित्य संमेलन तसेच विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना एक लाख रुपयांचा कृतज्ञ
पुणे : पिंपरी येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाहीर केल्याप्रमाणे मराठी साहित्य संमेलन तसेच विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना एक लाख रुपयांचा कृतज्ञता निधी नुकताच प्रदान केला. संमेलन संपल्यानंतर एका महिन्यात ही रक्कम संबंधित अध्यक्षांना दिला आहे.
घुमान येथील ८८व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व अंदमान येथील चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात स्थापन झालेल्या अध्यासनाच्या वतीने संमेलनातच प्रत्येकी ५ लाखांचा निधी प्रदान केला. माजी संमेलनाध्यक्षांनाही एक लाखाचा निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये प्रा. के. ज. पुरोहित, डॉ. यू. म. पठाण, मधु मंगेश कर्णिक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मा. मिरासदार, प्रा. रा. ग. जाधव, मारूती चितमपल्ली, डॉ. अरुण साधू, फ. मुं. शिंदे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, वसंत आबाजी डहाके, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. महेश एलकुंचवार आदींचा समावेश आहे.
डॉ. एलकुंचवार यांनी मिळालेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला तर साधू यांनी एशियाटिक लायब्ररीला दिला. प्रा. जाधव यांनी साधना ट्रस्टकडे निधी सुपूर्द केला. डॉ. मोरे यांनी हा निधी इतिहास प्रकल्पासाठी वापरला जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)