ग्रामीण भागातील एक लाख शाळांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:40+5:302021-02-23T04:17:40+5:30
मुळशीतील आदिवासी शाळा : १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उर्मी, ...
मुळशीतील आदिवासी शाळा : १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उर्मी, कौशल्य क्षमता मोठी आहे. शहरी विद्यार्थ्यांसारख्या सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या, तर तेही वैश्विक स्तरावर आपली ओळख निर्माण करतील. हीच गोष्ट लक्षात घेऊन जगभरातील शाळा एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील एक लाख शाळांचे डिजिटायझेशन पुढील काळात करण्याचे ध्येय आहे,” असे मत संगणक तज्ज्ञ आणि ग्लोबल क्लासरूम्स व नमस्कार विथ लव्ह फाउंडेशनचे संस्थापक संतोष तळघट्टी यांनी व्यक्त केले.
मुळशी तालुक्यातील कोंढूर येथील अमृतेश्वर विद्यालय या आदिवासी शाळेतील पाचवी ते दहावीतील १०० विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने दफ्तर, कंपास बॉक्स, स्टेशनरी, मास्क व इतर शालेय साहित्य भेट देण्यात आले. प्रसंगी संतोष तळघट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, गट शिक्षण अधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, केंद्र प्रमुख सोपान ठाकोरे, अमृतेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, कोंढूरच्या सरपंच सारिका कुडले, अंकिता खुडे, संचालक तानाजी शिंदे, विठ्ठल हालंदे, सुरेश दिघे आदी उपस्थित होते.
-फोटो जेएम एडीट