फ्लॅटवर लोन करुन देण्याच्या बहाण्याने सव्वालाख उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 07:46 PM2018-08-02T19:46:32+5:302018-08-02T19:50:09+5:30

फ्लॅटवर लोन करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ती कागदपत्र बनावट असल्याचे सांगत १ लाख १५ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे.

one lakhs 25 thousands rupees fraud due to loan on the flat | फ्लॅटवर लोन करुन देण्याच्या बहाण्याने सव्वालाख उकळले

फ्लॅटवर लोन करुन देण्याच्या बहाण्याने सव्वालाख उकळले

Next
ठळक मुद्देसर्व कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : फ्लॅटवर लोन करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्र घेवून ती कागदपत्र बनावट असल्याचे सांगत १ लाख १५ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
नऱ्हे येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र प्रकाश पवार (वय २६, रा. दिघी) आणि डेव्हीड अ‍ॅन्थनी लोपीस (वय २७, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या प्लॅटवर लोन करून देतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचे खरेदी दस्त आणि इतर कागदपत्रे त्यांना दिली. मात्र ही सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांच्या या धमक्यांना घाबरून फिर्यादी यांनी गेल्या वर्षभरात १ लाख १५ हजार रुपये त्यांना दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे करत आहेत. 

Web Title: one lakhs 25 thousands rupees fraud due to loan on the flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.