महायुतीच्या मतामध्ये दीड लाखाने वाढ

By admin | Published: May 17, 2014 05:44 AM2014-05-17T05:44:18+5:302014-05-17T05:44:18+5:30

महायुतीच्या एकूण मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २००९ च्या तुलनेत तब्बल १ लाख ४७ हजार ३६९ अधिक मते शिवसेनेच्या पारड्यात पडली आहेत,

One millionth increase in the votes of the Mahayuti | महायुतीच्या मतामध्ये दीड लाखाने वाढ

महायुतीच्या मतामध्ये दीड लाखाने वाढ

Next

पिंपरी : महायुतीच्या एकूण मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २००९ च्या तुलनेत तब्बल १ लाख ४७ हजार ३६९ अधिक मते शिवसेनेच्या पारड्यात पडली आहेत, तर राष्टÑवादी कॉँग्रेसची मते एक लाखाने घटली. भापकर व बहुजन समाज पक्षाच्या मतांमध्ये भर पडली. गेल्या निवडणुकीत खासदार गजानन बाबर यांना ३ लाख ६४ हजार ८५७ मते पडली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आझम पानसरे यांचा ८० हजार ६१९ इतक्या मतांनी पराभव केला होता. हीच परंपरा सेनेचे श्रीरंग बारणे यंदा कायम राखली. त्यांनी गेल्या वेळेपेक्षा दीड लाखाने अधिक ५ लाख १२ हजार २२६ मते घेतली. त्यांनी जवळचे प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मण जगताप यांचा १ लाख ५७ हजार ३९७ इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला. राष्टÑवादी काँग्रेसच्या राहुल नार्वेकर यांच्यापेक्षा बारणे यांची मते ३ लाख २९ हजार ९३३ इतकी भरघोस मते मिळविली. गेल्या वेळेच्या तुलनेत राष्टÑवादीची तब्बल १ लाख १ हजार ९३३ ने इतकी मते घटली. गेल्या निवडणुकीत अपक्ष असलेले मारुती भापकर यांच्या मतामध्ये वाढ झाली आहे. यंदा ते आम आदमी पार्टीकडून मैदानात होते. ८ हजार ७६० वरून वाढ होत त्यांनी ३० हजार ५६६ मते घेतली. बहुजन समाज पक्षाच्या मतातही वाढ झाली. गेल्या वेळेस उमाकांत मिश्रा यांना २० हजार ४५५ व यंदा भीमपुत्र गायकवाड यांना २५ हजार ९८२ मते मिळाली. एकूण ५ हजार ५२७ मते अधिक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: One millionth increase in the votes of the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.