उपायुक्त संदीप कदम यांच्याकडून एक महिन्याचे वेतन मदतनिधीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:06+5:302021-04-30T04:15:06+5:30
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन आणि पुणे मनपाच्या प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्ध पातळीवर ...
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन आणि पुणे मनपाच्या प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्ध पातळीवर अहोरात्र सुरू आहेत. अशावेळी महापालिकेचे परिमंडळ क्रमांक ४ चे उपायुक्त संदीप कदम यांनी आपले मार्च महिन्याचे संपूर्ण वेतन महापालिकेस मदत म्हणून दिले आहे.
महापालिका प्रशासकीय यंत्रणा सर्व पातळ्यांवर काम करीत असताना, सामाजिक बांधिलकी जपणा-या व्यक्ती/ संस्थेच्यावतीने शहरातील तळागाळातील नागरिकांसाठी मदतीचा हात मिळत असतो. त्याप्रमाणे कदम यांनी गुरूवारी मार्च महिन्याच्या ७५ हजार ७६७ रुपयांचा धनादेश मदत म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्त केला.
यावेळी विक्रम कुमार यांनी कदम यांचे अभिनंदन करून कदम यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणा-या व्यक्ती/ संस्थेच्यावतीने सहकार्य मिळाल्याने प्रशासनास किंवा शासन यंत्रणेस निश्चितच उर्जा मिळत असल्याचे सांगितले.
--------------------------
फोटो - संदीप कदम