सवतींच्या भांडणात एकीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:52 AM2018-03-08T03:52:12+5:302018-03-08T03:52:12+5:30

येथील कामराजनगरमध्ये राहणाºया सारिका सुनील राठोड (वय ४२) आणि बीना सुनील राठोड (वय ३०) या दोघी सवतींच्या भांडणात सारिका राठोड यांचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली.

 One murder in all the disputes | सवतींच्या भांडणात एकीचा खून

सवतींच्या भांडणात एकीचा खून

Next

येरवडा - येथील कामराजनगरमध्ये राहणाºया सारिका सुनील राठोड (वय ४२) आणि बीना सुनील राठोड (वय ३०) या दोघी सवतींच्या भांडणात सारिका राठोड यांचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी येरवडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन आणि गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पोलीस फौजफाट्यासह भेट दिली. आरोपी बीना राठोड यांना येरवडा पोलिसांनी अटक केली असून तिला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवले आहे.
पूनम संजय चव्हाण (वय २८, व्यवसाय गृहिणी, रा. सर्व्हे नं. १०, कामराजनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पूनम या त्यांच्या पती, दोन मुले, बहीण सारिका राठोड हिची दोन मुले गंगा ऊर्फ सोना आणि दर्शना ऊर्फ मोना यांच्यासह राहण्यास आहेत. पूनम यांचे पती खासगी कंपनीमध्ये हाऊसकीपिंगचे काम करतात. त्या घरीच असतात. त्यांची बहीण सारिका राठोड हिचे १५-१६ वर्षांपूर्वी सुनील राठोड यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यांना वरीलप्रमाणे दोन मुली आहेत. सुनील हे इस्टेट एजंटचे काम करतात. ते दोघे पती-पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब पूनम यांच्या घरासमोरच राठोड यांच्या मोठ्या भावाच्या घरात राहण्यास आहेत. सुमारे ५-६ वर्षांपूवी सुनील राठोड यांची पूर्वी लष्कर कॅम्प भागात राहण्यास असलेल्या बीना हिच्याशी ओळख होऊन नंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. राठोड यांनी बीना हिला दुसरी पत्नी म्हणून स्वीकारून तिला प्रथम अशोकनगर येथे आणि त्यानंतर तिला गणेशनगरमधील अंचू चायनिज सेंटर समोरील गल्लीमधील घरात आणून ठेवले होते. पर्णकुटी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुशील बोबडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title:  One murder in all the disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.