Pune : गुन्हा मागे घे म्हणून कळंबमध्ये एकावर गोळीबार; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 05:12 PM2022-11-11T17:12:41+5:302022-11-11T17:19:31+5:30

याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा व शस्त्रास्त्रे प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

One shot in Kalamb to withdraw crime walchandnagar pune latest crime | Pune : गुन्हा मागे घे म्हणून कळंबमध्ये एकावर गोळीबार; परिसरात खळबळ

Pune : गुन्हा मागे घे म्हणून कळंबमध्ये एकावर गोळीबार; परिसरात खळबळ

Next

वालचंदनगर (पुणे) : यापूर्वी दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घे अन्यथा तुला संपवीन, अशी धमकी देत कळंब येथे दोन जणांनी बंदकीतून गोळीबार केला आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा व शस्त्रास्त्रे प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात सूरज दादासो वाघमोडे (रा. कळंबोली, ता. माळशिरस), गजानन किसन जाधव (रा. कळंब, ता. इंदापूर) व अन्य एक जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब येथील सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके हे कळंब गावातील आंबेडकर उद्यानात मित्रांसमवेत बसलेले असताना दुचाकीवरून येऊन बंदुकीने गोळ्या झाडल्याची फिर्याद सुयश घोडके यांनी दिली आहे.

कळंब येथील आंबेडकर उद्यान येथे सुयश उर्फ तात्या यांचा मित्र महेश शंकर ढेकळे (रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर ) याच्यासोबत गप्पा मारत बसले असताना पुतण्या रोहित अनिल घोडके (रा. कळंब) व त्याचा मित्र मयुर सुनील किर्दक( रा. पिराळे, ता. माळशिरस ) व अक्षय भारत बनसोडे (रा. कळंब, ता. इंदापूर) असे झेंड्याच्या कट्ट्याच्या बाजूस असणाऱ्या सरकारी दवाखान्याच्या पायरीवरती बसले होते, त्यावेळी पांढऱ्या रंगाची दुचाकी सरकारी दवाखान्यासमोर आलेली दिसली व अचानक मला गोळी झाडल्याचा आवाज आला. दुचाकीवरून एक अनोळखी इसम व त्याचे पाठीमागे सूरज दादासो वाघमोडे (रा. कळबोली, ता. माळशिरस ) हा बसलेला दिसला. त्यावेळी सूरज वाघमोडे याने हातातील बंदुकीने सुयश उर्फ तात्या याच्या दिशेने गोळी झाडली व जातीवाचक शिवीगाळ करीत आणि गुन्हा माघारी घे, या कारणावरून गोळीबार केला. सूरज वाघमोडे याने गोळ्या झाडत दुचाकीवर बसून अन्य इसमांसह महाविद्यालयाच्या दिशेने निघून गेले.

यावेळी दवाखान्यात बसलेले सुयश यांचा पुतण्या रोहित व मित्र मयुर, अक्षय हे बाहेर आले व मयुर किर्दक यांच्या म्हणण्यानुसार अनोळखी व्यक्तीने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या असून पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी करत आहेत.

Web Title: One shot in Kalamb to withdraw crime walchandnagar pune latest crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.