पुण्यात एकतर्फी प्रेमातून गोळीबार! खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 02:36 PM2021-05-27T14:36:42+5:302021-05-27T14:36:50+5:30

हवेली पोलिसांनी केले एकाला अटक

One-sided love shooting in Pune! Incident at Kolhewadi near Khadakwasla | पुण्यात एकतर्फी प्रेमातून गोळीबार! खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथील घटना

पुण्यात एकतर्फी प्रेमातून गोळीबार! खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देपिस्तुल हिसकावून घेऊन त्याच्यावर पिस्तुलामधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

पुणे: एकतर्फी प्रेमातून खडकवासलाजवळील कोल्हेवाडी येथे कारमधून जाणार्‍यावर गोळीबार करण्याचा प्रकार घडला़ आहे.  याप्रकरणी हवेली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

अक्षय ऊर्फ रावण चंद्रकांत दुबे (रा. कोल्हेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोल्हेवाडीत राहणार्‍या ४५ वर्षाच्या व्यक्तीने हवेली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे २६ मे दुपारी ४ वाजता कोल्हेवाडी येथील हॉटेल मुक्ताई समोर असताना त्यांना दुबे दिसला. त्यांनी तु आमच्या नातेवाईक महिलेला त्रास का देतो, त्यांच्या घरी मोबाईल फोन व चायनीज पदार्थ का पाठविले, असे विचारले. त्यावरुन त्याने फिर्यादीशी झटापट करुन त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर रोखली. त्यामुळे फिर्यादी हे कारमध्ये बसून पोलीस ठाण्याकडे येत होते. वाटेत किरकटवाडी फाटा येथे ते आले असताना अक्षय याने भाचा शुभम याचे हातात असलेले पिस्तुल हिसकावून घेऊन त्याच्यावर पिस्तुलामधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ केली. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की, एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून आरोपीला अटक केली आहे.

Web Title: One-sided love shooting in Pune! Incident at Kolhewadi near Khadakwasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.