आळंदी म्हातोबा ग्रामपंचायतीवर म्हातोबा ग्रामविकास पॅनलची एकहाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:10 AM2021-01-22T04:10:30+5:302021-01-22T04:10:30+5:30
श्रीनाथ म्हातोबा ग्रामविकास पॅनलमध्ये हवेली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, अशोक जवळकर, भगवान जवळकर, लक्ष्मण भोंडवे, मोहन जवळकर, बाळासाहेब ...
श्रीनाथ म्हातोबा ग्रामविकास पॅनलमध्ये हवेली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, अशोक जवळकर, भगवान जवळकर, लक्ष्मण भोंडवे, मोहन जवळकर, बाळासाहेब शिवरकर, सोमनाथ जवळकर, कैलास खटाटे, दिनकर भोंडवे, वाल्मिक जवळकर, माऊली जवळकर, शंकर जवळकर यांनी गावातील आपले अस्तित्व दाखवून दिले असून या विजयी पॅनेलची जबाबदारी यांनी सांभाळून विजयावर शिक्कामोर्तब केला. विजयी उमेदवार एक नंबर वार्ड श्रीहरी काळभोर,स्वाती जवळकर,सुनीता जवळकर
वार्ड क्रमांक दोन मध्ये बिनविरोध पारस वाल्हेकर, सोनाली माकर,वार्ड क्रमांक तीन मध्ये दयानंद शिवरकर,सुनीता शिंदे वार्ड क्रमांक चार मध्ये तीन पैकी एक बिनविरोध उज्वला शिवरकर तर विनायक जवळकर व सायली शिवरकर निवडून आले.तसेच वार्ड क्रमांक पाच मध्ये मनीषा भोंडवे,सोनाली जवळकर,सखाराम थोरात अशा एकूण १३ उमेदवारांचा विजय झाला.
आळंदी म्हातोबा येथील वार्ड क्रमांक ३ चे उमेदवार दयानंद शिवरकर या युवकाने मागील अनेक वर्षात सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे सहानुभूतीची लाट निर्माण केल्याने या युवकाला ग्रामस्थानी भरगोस मतांनी निवडून दिले.संतोष जवळकर यांनी शर्तीचे प्रयत्न या उमेदवारासाठी केले.
२१ थेऊर