माझ्या मृत्यूस साडू व मेहुणी जबाबदार आहे असा स्टेटस ठेवून एकाची रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 05:28 PM2019-07-23T17:28:35+5:302019-07-23T17:30:31+5:30
दुसरा विवाह केलेल्या तरूणाने सोळा दिवसांनंतर व्हाट्स अपवर माझ्या मृत्यूस साडू व मेव्हणी जबाबदार आहेत असे स्टेटस ठेवून आत्महत्या केली.
लोणी काळभोर : कोर्टात दुसरा विवाह केलेल्या तरूणाने सोळा दिवसांनंतर व्हाट्स अपवर माझ्या मृत्यूस साडू व मेव्हणी जबाबदार आहेत असे स्टेटस ठेवून रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांद रफिक शेख ( वय २८ ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील रफिक खलील शेख ( वय ५०, रा. तारमळा, थेऊर, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चांद याचा साडू अकबर शेख व मेहुणी सुुुमय्या ईब्राहिम सय्यद ( दोघे रा. सखाराम नगर, थेऊर) यांचे विरोधांत चांद यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद याचे पहिले लग्न झाले होते. काही कारणांमुळे तीन वषार्पूर्वी त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २५ जून रोजी त्याने सखाराम नगर, थेऊर येथे राहत असलेल्या सना या तरूणीशी पुणे येथील न्यायालयात विवाह केला होता.
बुधवार ( ३ जुलै ) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे थेऊर येथील राईज अॅण्ड शाईन कंपनीतील प्रयोगशाळेत कामाला गेला होता. त्यादिवशी दुुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याचा साडू व मेव्हणी हे त्यांचे घरी गेले. व सना हिची आई खूूूप आजारी आहे. तिला दोन दिवसांसाठी पाठवा असे सांगितले. यांवर रफिक शेख यांनी चांद आल्यानंतर घेऊन जा असे सांगितले. परंतू त्यांनी काही एक न ऐकता तिला घेऊन गेले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चांंद घरी आला. सदर बाब समजले नंतर तो सनाच्या घरी गेला त्यावेळी त्यालाही तिच्या नातेवाईकांनी दोन दिवसांनी पाठवतो असे कारण सांगितले होते. त्यानंतर चांद पत्नीला आणण्यासाठी वेळोवेळी तिचे घरी गेला परंतू त्याला तिला भेटू देत नव्हते. त्याला घरांत घेत नसत.
त्याने मोबाईलवर मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस माझा साडू अकबर व मेव्हणी सुमय्या जबाबदार आहे. असे स्टेटस ठेवले. काहीवेळाने गणेश कुंजीर यांनीफोन वरुन चांद याने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे रूळावर मिळून आला. पोलिसांनी त्याच्या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती.