गायकवाड विद्यालयाला एक हजार झाडे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:09+5:302021-07-30T04:10:09+5:30
दावडी गावाची वाढती लोकसंख्या पाहता व जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वृक्ष संतुलन राखले जावे, पर्यावरण जोपासावे, ...
दावडी गावाची वाढती लोकसंख्या पाहता व जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वृक्ष संतुलन राखले जावे, पर्यावरण जोपासावे, यासाठी पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील व दावडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शाळेला झाडे भेट दिली. शाळेला चिंच, लिंब, अशोक, बदाम, बांबू, सीताफळ, चिकू, ईडलिंबू, आपटा, करंज, गुलमोहर, पेरू, साग आदी झाडे देण्यात आली.
आत्माराम डुंबरे यांच्या हस्ते प्राचार्य अंकुश केंगारे यांना भेट दिली. या वेळी सचिन नवले, सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, माजी उपसरपंच हिरामण खेसे, आनंदराव तांबे, ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके, संतोष सातपुते, राणी डुंबरे, पुष्पा होरे, धनश्री कान्हूरकर उपस्थित होते.
२९ दावडी झाडे
शाळेला झाडे भेट देताना सरपंच संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, उपसरपंच राहुल कदम व मान्यवर.