कांदा ६ ते ९ रुपये किलो

By admin | Published: March 13, 2016 01:37 AM2016-03-13T01:37:29+5:302016-03-13T01:37:29+5:30

एकेकाळी गगनाला भाव भिडल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांदा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे़

Onion 6 to 9 kg | कांदा ६ ते ९ रुपये किलो

कांदा ६ ते ९ रुपये किलो

Next

चाकण : एकेकाळी गगनाला भाव भिडल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांदा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे़
चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा जनावरांच्या बाजारात ठेवावा लागतोे. चाकण बाजारात शनिवारी १९ हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये भाव असल्याने शेतकरीवर्गात मोठी नाराजी आहे. चाकण परिसरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेत आहेत. या वर्षी चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र त्यांची निराशा झाली़यंदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा होता़ चाकण परिसरातील शेतकऱ्यांनी कांदारोपे तयार करून व महागडी रोपे घेऊन कांदालागवड केली. आठ ते नऊ रुपये किलो दराने भाव मिळत असल्याने उत्पादनखर्चही निघत नाही, अशी खंत कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मजुरी खर्चही परवडत नसल्याने हमीभाव मिळावा, अशी मागणी य्जेजेराम टेमगिरे, वसंत तनपुरे, बाळासाहेब काळडोके, भरत हुंडारे, रघुनाथ टेमगिरे, सुदाम सावंत, रोहिदास गोपाळे, संभाजी पाचपुते यांनी केली आहे.कांदापिकाला लागवड, मजुरी, बियाणे, खते, औषधे, काढणी यासाठी एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. परंतु, भाव गडगडल्याने एकरी २५ ते ३० हजार रुपये मिळत असून, शेतकऱ्यांना एकरी ५ ते १० हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. हमीभाव नसल्याने मुद्दल खर्चही निघत नाही.
- वसंत तनपुरे (गोनवडी)कांदालागवडीसाठी येणारा खर्च, पाणी, औषधे आणि मजुरीही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेले चार महिने कांदालागवड केल्यापासून कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, बाजारात कांद्याची प्रचंड आवक होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.
- भरत हुंडारे (पिंपरी बुद्रुक)

Web Title: Onion 6 to 9 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.