बाजारात कांद्याची आवक वाढून भाव स्थिर, बटाट्याची आवक वाढून भावात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:55 PM2018-05-13T17:55:46+5:302018-05-13T17:55:46+5:30

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४२०० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपये झाला .

Onion and potato rates in market | बाजारात कांद्याची आवक वाढून भाव स्थिर, बटाट्याची आवक वाढून भावात घट

बाजारात कांद्याची आवक वाढून भाव स्थिर, बटाट्याची आवक वाढून भावात घट

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक वाढून भाव स्थिर राहिले. बाजारात कांद्याची एकूण आवक ४२०० क्विंटल झाली. कांद्याची आवक ७०० क्विंटलने वाढून भाव ९०० रुपयांवर स्थिर राहिले. बटाट्याची आवक वाढून भाव घटल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली. 

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४२०० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपये झाला . तळेगाव बटाट्याची एकूण आवक १४०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५३० क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव ३०० रुपयाने घटून १४०० रुपये झाला . याही सप्तहात भूईमुग शेंगाची आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक १० क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव ३ हजार रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ३९० पोती झाली.

राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ९५ हजार जुड्यांची आवक होऊन २०० ते १३०० रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर २ लाख ७० हजार जुड्यांची आवक होऊन ५०० ते १८०० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक २२००० हजार जुड्या झाली. ४०० ते १००० असा जुड्यांना भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :–
कांदा - एकूण आवक - ४२०० क्विंटल. भाव क्रमांक १ : ९०० रुपये, भाव क्रमांक : ७५० रुपये,  भाव क्रमांक ३ : ६०० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १७३० क्विंटल. भाव क्रमांक १ : १४०० रुपये, भाव क्रमांक २ : १२०० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.
लसूण - एकूण आवक - १० क्विंटल. भाव क्रमांक १ : ३००० रुपये, भाव क्रमांक २ : २५०० रुपये, भाव क्रमांक ३ : २००० रुपये.

फळभाज्या :-
-------------
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागाना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-
टोमॅटो - १०२२ पेट्या ( ३०० ते ६०० रू. ), कोबी - २९० पोती ( ३०० ते ६०० रू. ), फ्लॉवर - ३४० पोती ( ४०० ते ७०० रु.),
वांगी - ३६० - पोती ( ८०० ते १६०० रु.), भेंडी - ४७० पोती ( २००० ते ३००० रु.), दोडका - २१० पोती ( २००० ते ३००० रु.),
कारली - २४० डाग ( २००० ते ३००० रु.),  दुधीभोपळा - २४५ पोती ( ८०० ते १६०० रु.), काकडी - २४८ पोती ( १००० ते २००० रु.),
फरशी - ७० पोती ( ४००० ते ६००० रु.), वालवड - २२५ पोती ( २००० ते ३००० रु.), गवार - १९५ पोती ( २००० ते ३००० रू.),
ढोबळी मिरची - ४५० डाग ( १००० ते २००० रु.), चवळी - ४५ पोती ( २५०० ते ३५०० रुपये ), 
शेवगा - १७५ डाग ( २००० ते ३००० रु. ) रुपये . गाजर -९० डाग ( ८०० ते १४०० ) रुपये. 

पालेभाज्या :–
—————
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : -
मेथी - एकूण २२८०५ जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २१२१० जुड्या ( ५०० ते १००० रुपये ),
शेपू - एकुण ६४९० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), पालक - एकूण ५४८५ जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).

जनावरे :-
-----------
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५० जर्शी गायींपैकी ३५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रुपये ),
१५० बैलांपैकी १२५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३५,००० रुपये ), ७० म्हशींपैकी ६० म्हशींची विक्री झाली. ( २५,००० ते ५०,००० रुपये ),
शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९८५० शेळ्या - मेंढ्यापैकी ९६४० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना (१२०० ते १०,००० ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी उलाढाल झाली.
 

Web Title: Onion and potato rates in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.