ढगाळ वातावरणामुळे कांदा, गव्हाला धोका; शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:32 AM2018-03-17T00:32:52+5:302018-03-17T00:32:52+5:30
बुधवारपासून असलेले ढगाळ वातावरण अजून निवळलेले नसून मोठा पाऊस होतो की काय, या धास्तीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे काढणीसाठी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, आंबा ही पिके धोक्यात आली आहेत.
घोडेगाव : बुधवारपासून असलेले ढगाळ वातावरण अजून निवळलेले नसून मोठा पाऊस होतो की काय, या धास्तीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे काढणीसाठी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, आंबा ही पिके धोक्यात आली आहेत.
सध्या कांदा व गहू ही पिके काढणीला आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात करपू शकते व मावा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जमिनीत कांदा वाढत नाही व उत्पादनात घट होते. अगोदरच कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी चिंचेत आहे व त्यात अशा वातावरणामुळे अजून नुकसान होणार आहे. तसेच काढणीसाठी आलेला गहू पावसामुळे जमिनीवर पडून खराब होऊ शकतो. आंब्याला या वातावरणाचा फटका बसणार आहे. मोहरातून निघालेली कनी या ढगाळ वातावरणामुळे गळून जाऊ लागली आहे. तसेच थोड्या मोठ्या झालेल्या फळावर पावसाचा थेंब पडल्याने हे फळ खराब होणार आहे. तसेच सध्या द्राक्षाला ३५ ते ४० रुपये असा बाजारभाव मिळत असला तरी अचानक पडलेल्या पावसामुळे काढणीला आलेली द्राक्ष खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
वातावरणातील सततच्या बदलामुळे जशी माणसे आजारी पडतात तशीच अवस्था पिकांची झाली आहे. काही दिवस कडक ऊन तर मध्यच थंडी व ढगाळ वातावरण, शेतमाल कसा पिकवावा असा प्रश्न पडला आहे.
या ढगाळ वातावरणाचा कांदा,
गहू, आंबा या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शिनोली
येथील शेतकरी मधुआप्पा
बोºहाडे यांनी व्यक्त केली.