कांद्याने आणले डोळ्यांत पाणी! लागवडीचा खर्चही हाती पडेना, शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:34 AM2018-12-24T00:34:57+5:302018-12-24T00:35:02+5:30

सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

Onion brought water in the farmer's eye | कांद्याने आणले डोळ्यांत पाणी! लागवडीचा खर्चही हाती पडेना, शेतकरी चिंताग्रस्त

कांद्याने आणले डोळ्यांत पाणी! लागवडीचा खर्चही हाती पडेना, शेतकरी चिंताग्रस्त

googlenewsNext

दावडी : सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याला भाव नसल्याने शेतकरी शेतातील कांद्याची काढणी करण्याचे टाळत आहे. चाकण येथील मार्केटमध्ये केवळ पाच ते सहा रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही हाती पडत नसून शेतकरी हतबल झाले आहे.

खेड तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कांद्याची लागवड केली आहे. काही शेतक-यांचे कांदे काढणीसाठी तयार झाले आहे. मात्र बाजार नसल्यामुळे पिकावर नांगर फिरवण्याची वेळ येणार आहे. गेल्यावर्षी कांद्याला चांगला भाव असल्यामुळे यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. एक एकर शेतीत कांदा लावण्यासाठी मशागतीपासून लागवड, खते, फवारणी, कापणी, गोणी भरणी, मजुरी, वाहतूक असा एकूण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. सध्या भाव उतरल्याने उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याचे चित्र दिसत आहे.

भाव चांगला म्हणून लावला, पण फसलो!
गतवर्षी कांदा कांदा उत्पादनातून चांगला फायदा झाल्याने यंदा एक एकरात कांद्याची लागवड केली. यासाठी मशागत, लागवड, खुरपणी, खते असा ८० हजार रुपये खर्च झाला. याशिवाय काढणी कापण्यासाठी आणखी २० हजार रुपयांच्या जवळपास खर्च येणार आहे.
त्यामुळे पंधरा दिवसांत कांद्याचा भाव वाढला तरच कापणी करणार नाही तर कांदे तसेच शेतात सोडून देणार, अशी प्रतिक्रिया खेड तालुक्यातील मांजरेवाडी (पिंपळ) येथील शेतकरी मनोहर मांजरे यांनी व्यक्त केली.

यंदा चांगला बाजारभाव मिळेल म्हणून कांदा लागवड केली. सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. परंतु, बाजारात कांद्याला चार ते पाच रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे उर्वरित कांदा काढून काहीच उपयोग होणार नाही बाजारभाव नसल्याने कांदा काढणी थांबवली असल्याचे रेटवडी (ता. खेड) येथील शेतकरी दिलीप पवळे यांनी सांगितले.

...कापणी काढणे न केलेलीच बरी
खेड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. त्यामुळे काही शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. परंतु सध्या किरकोळ बाजारात पाच ते सहा रुपये किलोने विक्री होत आहे. चाकण बाजारपेठेमध्ये पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी झालेला खर्चही निघणार नसल्याने कांद्याची काढणी व काढणी करून काही उपयोग होत नसल्याचे दावडी येथील शेतकरी सुरेश डुंबरे यांनी सांगितले.

Web Title: Onion brought water in the farmer's eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.