आवक घटल्याने कांदा वधारला

By admin | Published: November 9, 2015 01:56 AM2015-11-09T01:56:16+5:302015-11-09T01:56:16+5:30

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली. यामुळे भावात वाढ झाली. बटाट्याची आवक वाढून भावही वाढले.

Onion decreased due to inward drop | आवक घटल्याने कांदा वधारला

आवक घटल्याने कांदा वधारला

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली. यामुळे भावात वाढ झाली. बटाट्याची आवक वाढून भावही वाढले. जळगाव भुईमूग शेंगा, गवार, शेवगा आवक वाढली. फळभाज्यांच्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटून भावही घटले. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथीची आवक सहा पटीने, तर कोथिंबिरीची आवक दुपटीने वाढून भाव घटले. जनावरांच्या बाजारात बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊन विक्रीतही वाढ झाली.
कांद्याची आवक १६० क्विंटलने घटली व कांद्याला ८०० ते ४००० रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बटाट्याची आवक या आठवड्यात ३१५ क्विंटलने वाढली. एकूण
१०१५ क्विंटल आवक होऊन बटाट्याला या आठवड्यात ४०० ते १२०० रुपये असा प्रतिक्विंटलला प्रतवारीनुसार भाव मिळाला. बाजारात एकूण उलाढाल २ कोटी ६ लाख ९८ हजार रुपये झाली.
जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक ११० क्विंटल झाली. त्यांचे भाव ५००० रुपयांवर स्थिरावले. बंदूक भुईमूग शेंगांची एकूण आवक ५० क्विंटल होऊन कमाल भाव ६५०० रुपयांवरून ७००० रुपयांवर पोहोचले. लसणाची आवक ३ क्विंटल झाली. लसणाला ७०० रुपयांचा कमाल भाव मिळाला.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात ७० हजार जुड्या मेथीची आवक झाली, तर ८० हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली व ६ हजार जुड्या शेपूची आवक झाली. बाजार समितीच्या शेलपिंपळगाव आवारात कोथिंबिरीची १००० व कोथिंबीरच्या ५०० जुड्यांची आवक झाली. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ३०० पोती झाली व मिरचीला ८० ते १२० रुपये असा प्रतिदहा किलोसाठी भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक : ४८० क्विंटल : भाव क्रमांक १ - ४००० रुपये, भाव क्रमांक २ - ३००० रुपये, भाव क्रमांक ३-८०० रुपये.
बटाटा : एकूण आवक १०१५ क्विंटल. भाव क्रमांक १- १२०० रुपये , भाव क्रमांक २- ८०० रुपये, भाव क्रमांक ३-४०० रुपये.
फळभाज्या : टोमॅटो- २५५ पेट्या (२८० ते ३३० रु), कोबी- २५० पोती (५० ते ६० रु. ), फ्लॉवर- ४६० पोती (५० ते १०० रु.), वांगी आवक नाही. भेंडी- २५० पोती (२५० ते ३०० रुपये) , दोडका- १२० पोती (३०० ते ३५० रुपये), कारली- २६० डाग (१५० ते २५० रुपये), दुधीभोपळा- १५० पोती (८० ते १२०), काकडी- १५० पोती (१०० ते १५० रुपये), फरशी - ६० पोती (५०० ते ६०० रुपये), वालवड- (आवक नाही), गवार-१७० डाग (३०० ते ४०० रुपये), ढोबळी- ३०० डाग (८० ते १३० रुपये), चवळी व वाटाणा - (आवक नाही) शेवगा- ११० डाग (३०० ते ४०० रुपये). (वार्ताहर)

Web Title: Onion decreased due to inward drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.