कांदा शेतकऱ्यांना रडविणार

By admin | Published: October 10, 2014 06:24 AM2014-10-10T06:24:18+5:302014-10-10T06:24:18+5:30

दिवाळीत कांद्याला ‘अच्छे दिन येतील’ या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला

Onion farmers will cry | कांदा शेतकऱ्यांना रडविणार

कांदा शेतकऱ्यांना रडविणार

Next

सोमेश्वरनगर : दिवाळीत कांद्याला ‘अच्छे दिन येतील’ या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला. मात्र, दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीही कांद्याचे दर वाढत नसल्याचे चित्र आहे. बाजारात कांद्याला उठाव नसल्याने, ऐन सणासुदीला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे.
लोणंद (ता. खंडाळा) येथे आज सहा हजार पिशव्यांची आवक झाली होती. प्रतवारीनुसार कांद्याला सध्या ६०० रुपयांपासून १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी हा दर ९०० ते १००० रुपये मिळाला. त्यातच पावसामुळे बराच खराब कांदा विक्रीसाठी येत आहे. मात्र, हा दर खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दर वर्षी ३१ आॅगस्टपर्यंत संपणारा साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून नवीन कांद्याची आवकही वाढणार आहे. मात्र, आवक एवढ्या प्रमाणावर नाही. तरीही कांद्याचे भाव वाढत नाहीत.
केंद्र सरकारने एकीकडे कांद्याच्या निर्यात मूल्यात वाढ केली, तर दुसरीकडे कांदा आयातीवरील निर्बंध आणखी कमी करून आयातही केली. त्यामुळे कांद्याच्या देशांतर्गत बाजारभावाला लगाम घालता गेला. कांद्याचे सध्याचे दर पाहता, ग्राहक सुखावला आहे. मात्र, कांद्याचे घसरलेले भाव उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे.
येणाऱ्या काही दिवसांत नवीन कांद्याची आवक वाढल्यास, भाव अजूनही कमी होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने जुलैमध्ये महागाई आटोक्यात आणण्यासाठी कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा आली. कांद्याची साठेबाजी करून काळाबाजार करणाऱ्यावर अटकाव बसला. याशिवाय कांद्याचे मूल्य ३०० डॉलरवरून ५०० डॉलर केले. यामुळे कांद्याचे भाव २५०० हजार रुपयांच्या आसपास राहिले. मात्र,
मध्यंतरी कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे सरकारने कांदा आयात केल्याने कांद्याचे भाव पुन्हा खाली आले. (वार्ताहर)

Web Title: Onion farmers will cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.