कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित

By अजित घस्ते | Published: November 10, 2023 06:34 PM2023-11-10T18:34:41+5:302023-11-10T18:34:56+5:30

शेतक-यांची चो-या थांबण्यासाठी ठेकेदाराच्या बिलातून वसूली करून नुकसान भरपाई

Onion, ginger, garlic are also being stolen The traders in the market yard were surprised | कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित

कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित

पुणे : मार्केटयार्ड फळबाजार, पालेभाज्या विभागात शेतमालाच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आडतदारांनी शेतक-यांच्याकडून खरेदी केलेला माल ही चोरीला  जात असल्याच्या घडना वाढल्या आहेत. पुर्वी बाजार आवारात मोबाईल, पैसे चोरीला जाणा-या घडना घडत होत्या. आता तर मोबाईल, पैसे बरोबर मार्केट बाजारात सध्या कांदा, लसूण, आले यांचा भाव वाढला आहे. त्याचबरोबर इतर भाज्यांचे ही भाव वाढलेला आहे. यामुळे चोरट्यांना आता कांदा, लसूण, आले चोरी करीत असल्याने बाजारात सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मार्केटयार्ड बाजारात वाहतूक कोंडी, चोरीच्या घटना वाढत आहे. यापार्श्वभुमीवर पदाधिकारी, आडतदार, ठेकेदार, उपसभापती, सचिव यांची संयुक्त बैठक घेतली गेली. यावर उपाय म्हणून यापुढे बाजारात शेतमालाच्या चोऱ्या झाल्यास त्याची नुकसान भरपाई ठेकेदारांच्या बिलातून वसुल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीची सभापती दिलीप काळभोर यांनी दिली.

फळे व भाजीपाला या दोन्ही विभागात शेतमाल चोन्यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, कॅमेरा, एसीचे बॉक्स, सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या तोडफोडीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गूळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली होती. त्यापैकी एका दुकानातुन सुमारे ३० हजार रुपयांची तर, भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे ३ लाखांची चोरी झाली होती. शिवनेरी रस्त्यावरील ज्योती पान शॉप फोडून रोख रक्कमेसह सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. मात्र, अलीकडे कांदा, लसूण, आले या फळभाज्यांचे भाव वाढल्यानंतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बाजार घटक हैराण झाले असून शेतकरी, आडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या बाजारात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याची वेळ सचिव तर काही वेळी संचालकांवर येत आहे.

Web Title: Onion, ginger, garlic are also being stolen The traders in the market yard were surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.