कांदा, बंदूक भुईमूग, लसणाचे भाव स्थिर

By Admin | Published: April 24, 2017 04:33 AM2017-04-24T04:33:57+5:302017-04-24T04:33:57+5:30

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. कांदा, बंदूक भुईमूग शेंगा

Onion, gun groundnut, garlic prices are stable | कांदा, बंदूक भुईमूग, लसणाचे भाव स्थिर

कांदा, बंदूक भुईमूग, लसणाचे भाव स्थिर

googlenewsNext

आसखेड : चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. कांदा, बंदूक भुईमूग शेंगा व लसणाचे भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाल्याने मिरचीचे भाव गडगडले. बटाट्याची आवक घटल्याने भावात मोठी वाढ झाली. या आठवड्यात चाकण बाजारात कांदा व बटाट्याची किरकोळ आवक झाली. हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाल्याने भाव कोसळले. जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसूण व बंदूक भुईमूग शेंगांची आवक व भावही स्थिर राहिले.
राजगुरुनगर बाजारात हिरवी मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, दोडका, कारली, दुधीभोपळा, ढोबळी मिरची, वाटाणा, वालवड, शेवगा व चवळीची काहीच आवक झाली नाही. शेलपिंपळगाव उपबाजारात फळभाज्यांची काहीच आवक झाली नाही. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात शेपू, पालक व मेथीची किरकोळ आवक झाली. राजगुरुनगर बाजारात पालक भाजीची, तर शेलपिंपळगावच्या उपबाजारात शेपू, मेथी व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल व म्हशींच्या संख्येत मोठी वाढ झाली. शेळ्या-मेंढ्यांची संख्या घटूनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल २ कोटी २५ लाख रुपये झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक २ हजार ९०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३ हजार ४०० क्विंटलने घटूनही कमाल भाव ६५० रुपयांवर स्थिरावले. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ६५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने घटल्याने भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव ८०० रुपयांवरून १,००० रुपयांवर पोहचला. जळगाव भुईमूग शेंगाची काहीच आवक झाली नाही. बंदूक भुईमूग शेंगांची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, या शेंगांना ६ हजार रुपये भाव मिळाला. गेल्या शनिवारच्या तुलनेत या शेंगांची आवक व भावही स्थिर राहिले.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ४१० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २४५ क्विंटलने वाढल्याने भावात घसरण झाली. हिरव्या मिरचीला २०० ते ३०० रुपये असा कमाल भाव मिळाला. राजगुरुनगरच्या मुख्य बाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. तर शेलपिंपळगाव उपबाजारात फळभाज्यांसह मेथी, शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही.

Web Title: Onion, gun groundnut, garlic prices are stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.