ओतूरला कांद्याची भाववाढ, १० किलोस २०१ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:32+5:302021-05-24T04:09:32+5:30
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारआवार येथे रविवारी १८ हजार २३ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. ...
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारआवार येथे रविवारी १८ हजार २३ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १८० रुपये ते २०१ रुपये भाव मिळाला. गुरुवारी याच नं.१ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस १७० रुपये ते १८५ रुपये भाव मिळाला होता. यात सरासरी १६ रुपयांची वाढ झाली आहे,अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव खालील प्रमाणे:
कांदा नं .१( गोळा )-१८० रुपये ते २०१ रुपये .
कांदा नं. २-( सुपर ) -१२० रुपये ते १८० रुपये .
कांदा नं. ३-( गोल्टा ) ८०रुपये ते १२० रुपये .
कांदा नं. ४(गोलटी / बदला ) -२० रुपये ते ८०रुपये
रविवारी बटाटा आवक झालीच नाही .मार्केटमध्ये शैतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनावर सॅनिटायझरची फवारणी करुन प्रवेश दिला जातो. मास्क लावून लिलाव केले जातात, असे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले .