आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:47+5:302021-03-22T04:09:47+5:30

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात प्रचंड घसरण ...

Onion prices declined due to higher inflows | आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले

आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात प्रचंड घसरण झाली. तळेगाव बटाट्याची आवक व भावही वाढले. भुईमूग शेंगांची आवक वाढूनही भाव वधारले. लसूणाच्या आवकेत किंचित वाढ होऊन भाव घसरले.

कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, दोडका, वाटाणा व गाजर या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू भाजीची आवक वाढल्याने बाजारभावात घट झाली. जनावरांच्या बाजारात बैल, म्हैस, जर्शी गाय व शेळ्यांमेंढयांच्या संख्येत मोठी वाढ झाली.एकूण उलाढाल ३ कोटी ५० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढल्याने कांद्याच्या भावात तब्बल ७०० रुपयांची मोठी घसरण झाली.कांद्याचा बाजारभाव २,४०० रुपयांवरून १,३०० रुपयांवर घसरले.

तळेगाव बटाट्याची एकूण १,००० आवक क्विंटल झाली.मागील शनिवारच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने वाढ होऊनही बाजारभावात ४०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवरून १,६०० पोहचले. लसणाची एकूण आवक १६ क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत ही आवक १ क्विंटलने वाढल्याने बाजारभाव ६,००० रुपयांवर स्थिरावले.भुईमूग शेंगांची २४ क्विंटलची आवक होऊनही भाव ७,००० पोहचले.

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २०८ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला ३,५०० ते ५,००० रुपये असा भाव मिळाला. शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –

कांदा - एकूण आवक - ४,५०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,३०० रुपये, भाव क्रमांक २. १,१०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.

बटाटा - एकूण आवक - १,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.

फळभाज्या

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - ६२ पेट्या ( ५०० ते १,००० रू. ), कोबी - १४७ पोती ( २०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - १४१ पोती ( ४०० ते ८०० रु.),वांगी - ५६ पोती ( ६०० ते १,२०० रु.). भेंडी - ५३ पोती ( २,५०० ते ३,५०० रु.),दोडका - ५१ पोती ( २,००० ते ३,००० रु.). कारली - ४६ डाग ( २,००० ते ३,००० रु.). दुधीभोपळा - ३८ पोती ( ६०० ते १,२०० रु.),काकडी - ४७ पोती ( १,००० ते २,००० रु.). फरशी - ३२ पोती ( २,५०० ते ३,५०० रु.). वालवड - ३० पोती ( २,००० ते ४,००० रु.). गवार - १६ पोती ( ४,००० ते ६,००० रू.), ढोबळी मिरची - ३७ डाग ( १,००० ते २,००० रु.). चवळी - १९ पोती ( ३,०००) ते ४,००० रुपये ), वाटाणा - १५० पोती ( ४,००० ते ५,००० रुपये ), शेवगा - २२ पोती ( २,००० ते ४,००० रुपये ), गाजर - १४३ पोती ( ८०० ते १,२०० रु.).

पालेभाज्या

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख १० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १०१ ते ६०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची १ लाख ५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १०१ ते ५०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १०१ ते ६०० रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण २६ हजार ५३० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २९ हजार ७५० जुड्या ( ३०० ते ६०० रुपये ), शेपू - एकुण २ हजार ६३० जुड्या ( ५०० ते ७५० रुपये ), पालक - एकूण ३ हजार ८५० जुड्या ( २०० ते ४०० रुपये ).

जनावरे

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ११० जर्शी गायींपैकी ८५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), १७० बैलांपैकी १४० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रुपये ), १८० म्हशींपैकी १३० म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १०,८५७ शेळ्या - मेंढ्यापैकी १०,४५० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना २,००० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.

२१ चाकण बाजार

चाकण बाजारात कांद्याची आवक.

Web Title: Onion prices declined due to higher inflows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.