मार्केट यार्डात किलोमागे १० रुपयांनी उतरले कांद्याचे दर; शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:05 PM2018-02-07T14:05:41+5:302018-02-07T14:09:33+5:30

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात येणाऱ्या कांद्याचे दर गेल्या दोन दिवसात एका किलो मागे १० रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Onion prices plummeted by Rs. 10 in the market yard; Unrest farmers | मार्केट यार्डात किलोमागे १० रुपयांनी उतरले कांद्याचे दर; शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

मार्केट यार्डात किलोमागे १० रुपयांनी उतरले कांद्याचे दर; शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

Next
ठळक मुद्देगेल्या दोन दिवसात एका किलो मागे १० रुपयांनी उतरले कांद्याचे दरमागणी कमी असताना आवक जास्त झाल्याने कांद्याचे दर १५ ते १८ रुपयांपर्यंत घसरले खाली

पुणे : निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याला भाव मिळेल असे शेतकऱ्यांना वाटले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला होता. परंतु, गुलटेकडी येथील मार्केट यार्डात येणाऱ्या कांद्याचे दर गेल्या दोन दिवसात एका किलो मागे १० रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून मार्केट यार्डात शंभर, सव्वाशे ते दीडशे गाडी दाखल होत होती. मात्र, बुधवारी मार्केट यार्डात २५० गाडी कांदा दाखल झाला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली. एका किलो मागे कांद्याला मिळणारा २० ते २५ चा भाव १६ ते २० रुपयांपर्यंत खाली आला आहे. केवळ पुण्यातच नाही तर सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारातही कांद्याचे दर कोसळले आहेत, असे मार्केट यार्डातील कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.
कांद्याचे व्यापारी विलास रायकर म्हणाले, की गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांद्याची १०० ते १५० गाडी आवक होत होती. आवक कमी असल्याने कांद्याला २० ते २५ रुपयांपर्यंत दर मिळत होता. सकाळी २२ ते २५ रुपये मिळालेला भाव दुपारंतर कमी झाल्याचेही दिसून येत होते. परंतु. बुधवारी कांद्याची २५० गाडी आवक झाली. मागणी कमी असताना आवक जास्त झाल्याने कांद्याचे दर १५ ते १८ रुपयांपर्यंत खाली घसरले. परंतु, चांगल्या प्रतिच्या कांद्याला २० रुपयांचा भाव मिळाला.

Web Title: Onion prices plummeted by Rs. 10 in the market yard; Unrest farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.