आळेफाटा उपबाजारात कांदाभाव स्थिरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:11 AM2021-09-19T04:11:59+5:302021-09-19T04:11:59+5:30
मागील महिनाभरापासून कांद्यास मिळणारे दर हे स्थिर राहिले आहेत. आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस ...
मागील महिनाभरापासून कांद्यास मिळणारे दर हे स्थिर राहिले आहेत. आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस कांदा लिलाव होतात. जुन्नर तालुक्यासह शेजारच्या शिरूर, पारनेर, संगमनेर, अकोले या तालुक्यांतील कांदा येथे विक्रीस येत असल्याने येथील आवक वर्षभर चांगली असते. साठवणूक करून ठेवलेला कांदा सडण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी कांदा विक्रीस आणत असल्याने मागील काही आठवडे बाजारात येथील कांदा आवकेचे प्रमाण वाढले आहे. आज शुक्रवारीही १७ हजार आठशे कांदा गोणी विक्रीस आल्या असल्याचे सचिव रुपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
परराज्यातून कांद्यास मागणी कमी झाल्याने कांदादर स्थिर असल्याचे कांदा आडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे, जीवन शिंदे, पप्पू गडगे व संदीप कोरडे यांनी सांगितले.
शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्यास मिळालेले प्रतिदहा किलो दर याप्रमाणे एक नंबर कांदा १६० ते १८० रुपये, दोन नंबर कांदा १३० ते १६० रुपये, तीन नंबर कांदा ६० ते १३० रुपये, चार नंबर कांदा २० ते ६० रुपये.