कांद्याच्या भावात पुन्हा होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:28 AM2020-12-14T04:28:01+5:302020-12-14T04:28:01+5:30
ओतूर : ओतूर येथील उपबाजारात रविवारी १६ हजार ५०३ कांदा पिशव्यांची आवक झाली. गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याच्या भावात पुन्हा ...
ओतूर : ओतूर येथील उपबाजारात रविवारी १६ हजार ५०३ कांदा पिशव्यांची आवक झाली. गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याच्या भावात पुन्हा वाढ होत आहे. कांदा नं १ (गोळा) प्रतवारीनुसार १० किलोस ३५१ ते ४०० रुपये भाव मिळाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलोस खालील प्रमाणे बाजारभाव मिळाले. कांदा नं १ (गोळा ) ३५१ ते ४०० रुपये. कांदा नं २- २५१ ते ३५० रुपये. कांदा नं ३- ( गोल्टा ) १५० ते २५० रुपये. कांदा नं ४ - (बदला ) ५१ ते २०० रुपये. बटाटा बाजारभाव - रविवारी ११३ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस १०० ते २६० रुपये बाजारभाव मिळाला. गुरुवार पेक्षा प्रतवारीनुसार १० किलोमागे बाजारभावात ४० रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती ओतूर उपबाजार आवाराचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली .