आळेफाटा बाजारात कांद्याच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:20+5:302021-01-23T04:11:20+5:30
आळेफाटा: येथील उपबाजारात शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या एक नंबर गोळा कांद्यास प्रती दहा किलो ३३० असा ...
आळेफाटा: येथील उपबाजारात शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या एक नंबर गोळा कांद्यास प्रती दहा किलो ३३० असा दर मिळाला तर जवळपास १८ हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या.
आळेफाटा उपबाजारात मंगळवार, शुक्रवार, रविवारीच्या आठवडे बाजारात १ जानेवारी पासून निर्यात बंदी हटवल्यानंतर कांदा दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या एक नंबर गोळा कांद्यास प्रती दहा ३५० असा दर मिळाला होता. आळेफाटा उपबाजारात
नवीन लाल सेंद्रिय कांद्याचे विक्रीस येण्याचे प्रमाण अधिक असून जुना गावरान कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण घटले आहे. आजच्या लिलावात चांगल्या प्रतीच्या एक नंबर गोळा कांद्यास प्रती दहा किलो ३३० असा दर मिळाला असल्याचे सभापती संजय काळे उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले.
दरम्यान मागील आठवडे बाजार लिलावात कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी २१ हजारांच्या वर कांदा गोणी तर आज येथे १८ हजार कांदा गोणी विक्रीस आल्याचे कार्यालयप्रमूख प्रशांत महांबरे यांचे यांनी सांगितले. प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो मिळालेले दर असे एक नंबर गोळा कांदा ३१० ते ३३० रूपये दोन नंबर कांदा २९० ते ३१० व तीन नंबर कांदा २३० ते २९० व चार नंबर कांदा १०० ते १५० रूपये.