आवक स्थिर तरीही कांद्याच्या भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:02+5:302021-02-15T04:10:02+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहूनही भावात मोठी ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहूनही भावात मोठी वाढ झाली. तळेगाव बटाट्याची आवक वाढून बाजारभावात किंचित वाढ झाली. भुईमूग शेंगांची प्रचंड आवक वाढूनही भावात वाढ झाली. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. गाजर व वाटण्याची आवक कमी होऊनही भाव स्थिर राहिले.
कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा दोडक्याच्या आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले.पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू भाजीची आवक वाढल्याने भाव घसरले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल, म्हैशी व शेळ्यांमेंढ्यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ३५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व भावही स्थिर राहिले. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने वाढूनही बाजारभावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवरुन १,५०० रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक १५ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहूनही बाजारभाव १,००० रुपयांवर स्थिरावले. भुईमुग शेंगांची ७० क्विंटल आवक होऊनही भाव ८,००० वर पोहोचले.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १७० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,५०० ते ३,५०० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे:
कांदा - एकूण आवक - ३५०० क्विंटल. भाव क्रमांक १. ४,००० रुपये, भाव क्रमांक २. ३,५०० रुपये, भाव क्रमांक ३. ३,००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,३०० रुपये, भाव क्रमांक ३. १,१०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोमॅटो - ४९ पेट्या ( ८०० ते १,००० रू. ), कोबी - ७२ पोती ( ३०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - ६९ पोती ( ८०० ते १,४०० रु.),वांगी - ३४ पोती ( १,००० ते २,००० रु.). भेंडी - ३२ पोती ( ३,००० ते ४,००० रु.),दोडका - २८ पोती ( ३,००० ते ४,००० रु.). कारली - २७ डाग ( २,००० ते ३,००० रु.). दुधीभोपळा - २३ पोती ( ५०० ते १,००० रु.),काकडी - २६ पोती ( १,००० ते १,५०० रु.). फरशी - १४ पोती ( १,५०० ते २,५०० रु.). वालवड - १८ पोती ( ३,००० ते ४,००० रु.). गवार - १३ पोती ( ४,००० ते ६,००० रू.), ढोबळी मिरची - ३४ डाग ( १,००० ते २,००० रु.). चवळी - १२ पोती ( २,०००) ते ३,००० रुपये ), वाटाणा - ५२५ पोती ( १,८०० ते २,२०० रुपये ), शेवगा - १० पोती ( ४,००० ते ६,००० रुपये ), गाजर - १४२ पोती ( ८०० ते १,२०० रु.).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख १० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला २५१ ते ८०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ७० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते १,१०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ७०० ते १,५०० रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी - एकूण २८ हजार ५३० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - एकूण ३४ हजार ६५० जुड्या ( ८०० ते १,२०० रुपये ), शेपू - एकुण ४ हजार ५२० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), पालक - एकूण ३ हजार ९८० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसा ठी आलेल्या १२५ जर्शी गायींपैकी ६५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४,०००० रुपये ), १६५ बैलांपैकी १०३ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रुपये ), १७५ म्हशींपैकी १४२ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९,८७० शेळ्या - मेंढ्यापैकी ८,६४० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
१४ चाकण
चाकण बाजारात पालेभाज्यांचा लिलाव