आळेफाटा उपबाजारात कांदा भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:23+5:302021-09-25T04:10:23+5:30
आळेफाटा उपबाजारात गेला महिनाभर कांद्याला दहा किलोला कमाल भाव दोनशे रूपयांच्या खाली मिळत होता. दरम्यान, साठवणूक केलेला कांदा सडण्यास ...
आळेफाटा उपबाजारात गेला महिनाभर कांद्याला दहा किलोला कमाल भाव दोनशे रूपयांच्या खाली मिळत होता. दरम्यान, साठवणूक केलेला कांदा सडण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत असल्याने महिनाभरापासून येथील आवक वाढली आहे. यापुढेही येथील आवक वाढणार आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात भावात वाढ झाली. दहा किलो कांद्याला कमाल भाव दोनशे पाच रूपये मिळाला. शुक्रवारीही १९ हजार ७०० कांदा गोणी विक्रीसाठी आल्याचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
परराज्यातून कांद्याला मागणी वाढल्याने शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात कांदा भावात वाढ झाली असल्याचे आडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे, जीवन शिंदे, पप्पू गडगे व संदीप कोरडे यांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला प्रतवारीप्रमाणे प्रति दहा किलो मिळालेले भाव याप्रमाणे एक नंबर कांदा २२९ ते २५१ रूपये, दोन नंबर कांदा १८० ते २२० रूपये, तीन नंबर कांदा १४० ते १८० रूपये, चार नंबर कांदा ५० ते १५० रूपये.