Bergar: कांदा - टोमॅटोच्या चकत्या, चीजचा स्लाईस असा गोल - मटोल टेस्टी 'बर्गर'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 03:53 PM2022-11-13T15:53:32+5:302022-11-13T15:54:08+5:30

स्वदेशी वडापावचा परदेशी आविष्कार

Onion slices of tomato slice of cheese round chubby tasty burger | Bergar: कांदा - टोमॅटोच्या चकत्या, चीजचा स्लाईस असा गोल - मटोल टेस्टी 'बर्गर'

Bergar: कांदा - टोमॅटोच्या चकत्या, चीजचा स्लाईस असा गोल - मटोल टेस्टी 'बर्गर'

Next

राजू इनामदार

पुणे: मराठी मातीतल्या माणसाला कोट, टाय, बूट घालायला लावलं तर काय होईल? तो अवघडून जाईल. बर्गर व वडापाव हे दोन वेगळे प्रकार आहेत. कृती, आकारात व किमतीतही साम्य आहे. बर्गर प्रकार परदेशी (मंगोलियामधून काही हजार वर्षांपूर्वी आला असे म्हणतात.) असला तरी त्यावर स्वदेशी नव्या पिढीच्या शब्दश: उड्या पडतात. आता तर ते गावांमध्येही वेगवेगळ्या कंपन्यांच्या आउटलेटमधून मिळण्याची सोय झाली आहे.

आखीव रेखीव बन

याचा बन वेगळाच असतो. म्हणजे बेकरीतील बन कसा अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. हा बन मात्र एकदम कंपासने आखून घेतलेल्या वर्तुळासारखा. आतून पांढरा व बाहेरून तपकिरी रंगाचा. त्यावर छानसे पांढरे तीळ लावलेले असतात. या बनचे सुरीने कापून दोन भाग करायचे. दोन्ही भागांना भरपूर बटर, मेओनिज, चटणी लावायची, ही सुरीने लावलेली जास्त चांगले.

खरपूस खमंग टिक्की

टिक्की हा बर्गरमधील सर्वात महत्त्वाचा घटक. बटाटा उकडून त्यात हवे गाजर, मटार किंवा मग वेगळे काही हवे असेल तसे मिक्स करतात. मळून घेताना मग त्यात मसाले, मीठ, टाकायचे. या मिश्रणाचा हातावरच गोल बनच्या आकाराचा करायचा. तो तळून घ्यायचा. ही झाली टिक्की.

असा भरायचा बन

कापलेल्या बनमध्ये ती ठेवायची. त्याच्या खाली वर बटाचे, कांदा, टोमॅटो यांच्या चकत्या ठेवायच्या. चीजचा स्लाईस ठेवायचा. त्यावर सलॅडची पाने, ती नसतील तर कोबीची पाने ठेवली तरी छान. आणखी काही हवे असेल तर म्हणजे काकडी वगैरे तेही ठेवायला हरकत नाही. हा झाला बर्गर. त्याची उंची, बाहेरून दिसणारी सलॅडची पाने, मधूनच दिसणारी टिक्की, वरचे तीळ यामुळे बर्गरला एक आकर्षक स्वरूप मिळाले आहे.

तरुण चव

मेओनिज, चीज यामुळे बर्गरला एक तरुण चव मिळाली आहे. त्यातही ते मेल्ट म्हणजे वितळलेले असेल तर जास्त चांगले लागते. कांदा, बटाटा, टोमॅटो यांच्या चकत्याही मधूनच मजा आणतात. टिक्कीचा बाईट या सगळ्या चवीवर कळस चढवतो. हे नव्या पिढीचे खाणे आहे. शीत पेयांबरोबर सॉसला लावून महाविद्यालयांबाहेर, कट्ट्याकट्ट्यांवर रोज शेकडो बर्गर उदरस्थ केले जातात.

कुठे खाल - लॉ कॉलेज रस्त्यावर असीन बर्गर, गोयलगंगाच्या (सिंहगड रस्ता) खाऊगल्लीत,

कधी- दिवसभरात व संध्याकाळी कधीही

Web Title: Onion slices of tomato slice of cheese round chubby tasty burger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.