कांद्याची डेंगळे गेली चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:26+5:302021-04-14T04:09:26+5:30
या वर्षी कांदालागवड वाढणार आहे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा बियाणांसाठी डेंगळे लावले आहेत. त्यात थंडी व ...
या वर्षी कांदालागवड वाढणार आहे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा बियाणांसाठी डेंगळे लावले आहेत. त्यात थंडी व गर्मीतील चढउतारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डेंगळ्यांमध्ये बियाणे नीट उतरली नाहीत. त्यामुळे या वर्षी कांदा बियाणांची टंचाई जाणवणार आहे. यासाठी आत्तापासूनच शेतकरी कांदा बी विकत घेऊन ठेवत आहेत. सध्या कांदा बियाणाला तीन हजार ते साडेतीन हजार रूपये किलो भाव सुरू आहे.
त्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा बियाणांसाठी डेंगळे केले आहेत, त्यांचे डेंगळे चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहेत. नारोडी येथील विजय पवार यांनी सात गुंठ्यांत केलेल्या संपूर्ण डेंगळ्यांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. तीन महिन्यांचे पक्व झालेले व काढणीस आलेली डेंगळ्यांची फुले अतिशय शिताफीने कटरच्या साहाय्याने तोडून चोरून नेली.
याबाबत त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या सात गुंठ्यांतून अंदाजे पंधरा किलो कांदा बियाणे निघाले असते व आजचा बाजारभाव पाहता यातून पन्नास हजार रूपयांचे कांदा बी तयार झाले असते. कांदा लावण्यासाठीसुध्दा बी राहिले नाही, चोरट्यांना पकडले जावे, अशी मागणी शेतकरी विजय पवार यांनी केली आहे.
13042021-ॅँङ्म-ि02 - नारोडी ता. आंबेगाव येथील विजय पवार यांच्या शेतातील चोरून नेलेली डेंगळ्यांची फुले