इकडे जखमी ड्रायव्हर-क्लीनर विव्हळत होते, तिकडे लोकं कांदे भरत होते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:17 PM2018-11-01T16:17:46+5:302018-11-01T16:21:02+5:30
गंभीर जखमी ड्रायव्हर-क्लीनरला मदत करण्याऐवजी पिशव्या भरून फुकट कांदे नेण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे दुर्दैवी दृश्य बघायला मिळाले.
पुणे : पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावरुन कांद्याची वाहतुक करणाऱ्या ट्रकला अपघात झाल्यावर गंभीर जखमी ड्रायव्हर-क्लीनरला मदत करण्याऐवजी पिशव्या भरून फुकट कांदे नेण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे दुर्दैवी दृश्य बघायला मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेकडे वेगात निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून थेट पुलावरून खाली कोसळला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले असू ड्रायव्हर-क्लीनर गंभीर जखमी झाले होते. वलवन इथल्या एक्सिट पॉइंटवर सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातानंतर ट्रकमध्ये असलेला सर्व कांदा रस्त्यावर पसरला होता. या घटनेची खबर परिसरातील नागरिकांना लागली. त्यावेळी उलटलेला ट्रक कांद्याचा आहे समजल्यावर त्यांनी पिशव्या, गोण्या भरभरून कांदे नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र वेदनेने विव्हळणाऱ्या जखमींचा त्यांना विसर पडला होता. अपघातानंतर जुना पुणे-मुंबई महामार्ग काही वेळासाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर अपघाताची खबर मिळाल्यावर लोणावळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.