व्हॉट्सअ‍ॅपवर सांगूनही कांदा विकला जाईना...

By admin | Published: December 25, 2016 04:43 AM2016-12-25T04:43:08+5:302016-12-25T04:43:08+5:30

वर्षभर कांद्याचे बाजारभाव कमीच राहिल्याने आंबेगाव तालुक्यात यावर्षी कांद्याचे बी व रोपे यांना अपेक्षित मागणी नाही. विक्रीला फटका बसल्याने शेतकऱ्यांनी रोपविक्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या

Onion was not sold even by whiteswap ... | व्हॉट्सअ‍ॅपवर सांगूनही कांदा विकला जाईना...

व्हॉट्सअ‍ॅपवर सांगूनही कांदा विकला जाईना...

Next

मंचर : वर्षभर कांद्याचे बाजारभाव कमीच राहिल्याने आंबेगाव तालुक्यात यावर्षी कांद्याचे बी व रोपे यांना अपेक्षित मागणी नाही. विक्रीला फटका बसल्याने शेतकऱ्यांनी रोपविक्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. परंतु तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने आता रोपे अक्षरश: फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
कांदा पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. कांदा पिकाला वर्षभर बाजारभाव नाही. भांडवल शेतकऱ्यांच्या अंगावर आले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा बराखीत सडू लागला आहे. कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याने यावर्षी कांदा लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने घरी कांदा बी टाकून रोपे तयार करतो. मागील काही वर्षांपासून कांदा रोप तयार करून ते विकण्याचा व्यवसाय शेतकरी करत आहेत. त्यातून चांगला नफा शिल्लक राहतो. ४० ते ४५ दिवसांत हे रोप तयार झाल्यावर त्याची लागवड केली जाते.
वातावरण चांगले असल्याने रोपाची उगवण चांगली झाली आहे. शेतकऱ्यांनी अगोदरच रोपे टाकल्याने रोपे जास्त, मागणी मात्र कमी, असा प्रकार घडला आहे. वर्षभर कांद्याला बाजारभाव नाही, तसाच तो इतर तरकारी मालाला नाही. त्यामुळे कांदा लागवडीचा बेत अनेक शेतकऱ्यांनीरद्द केला आहे; त्याऐवजी गहू अथवा इतर पिकांकडे तो वळला आहे. काही शेतकरी रोपांची लागवड करताहेत. मात्र विकतचे रोप घेण्यास कोणीच तयार नाही. कांदा लागवड सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.

चिंचोडी येथील शेतकरी राजेंद्र शेवाळे यांनी कांदा रोप विक्रीसाठी काढले. मात्र त्यांना ग्राहकच मिळाले नाही. शेतकरी कांदा लागवड कमी करतात. त्यामुळे मागणीच नाही. शेवाळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला; मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. शेवटी कांदा रोप मोठे झाल्यावर उपटून फेकून देण्याची वेळ येणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

Web Title: Onion was not sold even by whiteswap ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.