महापालिकेच्या शाळांमध्ये आता ऑनलाईन प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:59+5:302021-06-09T04:11:59+5:30
पुणे : शहरातील खाजगी शाळांप्रमाणे आता महापालिकेनेही यंदा प्रथमच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे यावर्षी पालकांना प्रत्यक्ष ...
पुणे : शहरातील खाजगी शाळांप्रमाणे आता महापालिकेनेही यंदा प्रथमच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे यावर्षी पालकांना प्रत्यक्ष शाळांमध्ये न जाता महापालिकेच्या बालवाडी ते आठवी यातल्या कोणत्याही वर्गासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेता येईल.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल यांनी याबाबत माहिती दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १४ जून, २०२१ पासून ऑनलाईन करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत पालकांना अथवा विद्यार्थ्यांना पुणे महापालिकेच्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे अडचणीचे वाटत आहे. यामुळे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनेही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चौकट
असा घ्या प्रवेश
महापालिकेच्या मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या एकूण २७३ शाळांमध्ये पालकांना आता बालवाडी ते आठवी यापैकी कोणत्याही वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे. याकरिता संबंधितांनी़़़़़़़़़़़़़़़़़़़ या संकेतस्थळावर जावे. येथे आपण वास्तव्यास असलेल्या भागातील क्षेत्रिय कार्यालय निवडावे. त्या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या शाळांपैकी हवी असलेली शाळा निवडून सविस्तर माहिती भरावी. येथे संबंधित शाळेतील मुख्याध्यापक/शिक्षक यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या पाल्याचा मोफत प्रवेश निश्चित करता येईल.