ऑनलाईन प्रवेश परीक्षेद्वारे होणार पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 08:03 PM2019-04-18T20:03:54+5:302019-04-18T20:20:20+5:30

विद्यापीठातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये ८० हून अधिक पदवी व पदव्युत्तर तर सुमारे ७० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात.

Online admission will be done by posting with postgraduate admission to university courses | ऑनलाईन प्रवेश परीक्षेद्वारे होणार पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश

ऑनलाईन प्रवेश परीक्षेद्वारे होणार पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देजून महिन्यात प्रवेशपरीक्षा , विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुकरपणे पार पडणार शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सर्व अभ्यासक्रमांमध्ये फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश परीक्षा महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख शहरांमध्येही घेतली जाणार विद्यापीठातील अभ्यासक्रमांना लागु

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रवेश तसेच इतर शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हा महत्पुर्ण निर्णय घेतला आहे. ही परीक्षा महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख शहरांमध्येही घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुकरपणे पार पडणार आहे.
विद्यापीठातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये ८० हून अधिक पदवी व पदव्युत्तर तर सुमारे ७० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. यातील अनेक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची खुप धावपळ होते. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क भरावे लागते. त्यामुळे आर्थिक ताणही पडतो. आता यापुढे सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सर्व अभ्यासक्रमांमध्ये फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश दिले जाणार आहेत. त्यातील बहुतांश अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी मात्र ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल. संबंधित विभागांमध्ये होणाऱ्या परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जातील, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.
विद्यापीठातील पीएचडी आणि एमफिलसाठीची प्रवेश प्रक्रियाही जूनमध्येच घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या धर्तीवरच पदवी व पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तसेच देशातील काही प्रमुख महानगरांमध्ये घेतली जाईल. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचा विस्तार तर होईलच, शिवाय विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जवळच्या वा सोयीच्या शहरामध्ये परीक्षा देणे शक्य होईल. ऑनलाईन प्रक्रियेमुळे अर्ज दाखल करण्यापासून ते अभ्यासक्रम व वसतिगृहामध्ये प्रवेश मिळण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेचे सुसुत्रीकरण केले जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

............

जून महिन्यात प्रवेशपरीक्षा 
पदवी व पदव्युत्तर प्रवेशाची पहिली नलाईन प्रवेश परिक्षा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात घेतली जाणार आहे. ही परीक्षा बहुपयार्यी स्वरुपाची असेल. त्यामध्ये दोन विभाग असतील. पहिला विभाग २० गुणांचा असेल. त्यामध्ये तर्क, आकलन व सर्वसाधारण अध्ययन कल याबाबत प्रश्न असतील. तर दुसऱ्या भागामध्ये संबंधित अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी आवश्यक विषयांच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न असतील. हा भाग ८० गुणांचा असणार आहे.  ऑनलाईन प्रवेश अर्ज, अर्हता निकष, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, प्रवेश परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम यासंबंधीची सविस्तर माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
-----------

Web Title: Online admission will be done by posting with postgraduate admission to university courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.