बारावी परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज सोमवारपासून, मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:56 AM2017-09-17T01:56:12+5:302017-09-17T01:56:33+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणा-या बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दि. १८ सप्टेंबरपासून आॅनलाईन अर्ज करता येणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणा-या बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दि. १८ सप्टेंबरपासून आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज भरावा लागेल, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व काही विषय घेऊन बारावीच्या परीक्षेस बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
नियमित शुल्कासह दि. १९ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत महाविद्यालयामार्फत अर्ज भरता येईल. दि. १० ते १७ आॅक्टोबर या मुदतीत बँकेत शुल्क भरण्याची मुदत आहे.
विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरून दि. १० ते १७ आॅक्टोबर या कालावधीत अर्ज करण्याची सुविधा असेल. दि. १८ ते २५ आॅक्टोबरदरम्यान बँकेत शुल्क भरता येईल. अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक नोंदविणे बंधनकारक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.