लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बंधनकारक

By admin | Published: November 30, 2014 12:27 AM2014-11-30T00:27:02+5:302014-11-30T00:27:02+5:30

ज्या उमेदवारांनी अपॉइंटमेंट घेतलेली नाही अशा उमेदवारांची थेट पक्के लायसन्सची चाचणी घेतली जाणार नाही़ या ऑनलाइन अपॉइंटमेंटची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून सुरू होणार आह़े

Online Appointment Bond for Licenses | लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बंधनकारक

लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बंधनकारक

Next
पुणो : वाहनचालकांना पक्क्या लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बंधनकारक राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत ज्या उमेदवारांनी अपॉइंटमेंट घेतलेली नाही अशा उमेदवारांची थेट पक्के लायसन्सची चाचणी घेतली जाणार नाही़ या ऑनलाइन अपॉइंटमेंटची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून सुरू होणार आह़े 
परिवहन कार्यालयाच्या पुणो आळंदी रोड, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर व अकलूज या ठिकाणी पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी 1 डिसेंबरपासून संगणकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आह़े जे उमेदवार ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन येतील, त्याच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत़ 
असा भरावा ऑनलाईन अर्ज 
ज्या संगणकावरून उमेदवारांना अर्ज सादर करावयाचा आहे, त्या संगणकावर अॅक्रोबॅट रिडर व्हजर्न 9़ एक्स व इंटरनेट एक्सप्लोरर 7़क् ही प्रणाली सुरू असल्याची खात्री करा़ अर्ज गुगल क्रोम किंवा मोझीला, फायरफॉक्स या प्रणालीमध्ये सेव्ह होत नाही, याची नोंद घ्यावी़  5ंँंल्ल.ल्ल्रू.्रल्ल, 2ं1ं3ँ्र. ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावरील इश्यू ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स टू मी या ऑप्शनची निवड करा़ स्क्रीनवर आपणास एक अर्ज दिसेल व उजव्या बाजूला अर्जाचा क्रमांक असल्याची खात्री करून तो लिहून घ्यावा़ त्याखालील डीएल या ऑप्शनवर क्लिक कराव़े नंतर क्रमाक्रमाने अर्जातील माहिती भरावी़ लाल * हे चिन्ह असलेले सर्व रकाने भरणो आवश्यक आह़े अर्जात नमूद जन्मतारीख भरावी़ तसेच ज्या कार्यालयामार्फत परीक्षा द्यावयाची आहे, त्या कार्यालयाचे नाव, नेम ऑफ द आरटीओ / डीटीओ या ठिकाणी पुढीलप्रमाणो लिहाव़े प्रादेशिक कार्यालय, पुणोकरिता एमएच 12/ पिंपरी-चिंचवडसाठी एमएच 14/ बारामतीसाठी एमएच 42 याप्रमाणो लिहाव़े आपला वेब अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख तसेच व्हेरीफिकेशन कोड टाकून ओकेवर क्लिक करा़ 
अर्जातील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक कराव़े (अर्जातील पार्ट -सी व त्यापुढील माहिती भरू नये). तसेच या ठिकाणी असणा:या प्रिंट या ऑप्शनचा वापर करू नय़े वरील अर्ज सबमिट केल्यानंतर युवर अॅप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुल्ली असा संदेश येईल़ अजर्दाराने वेब अॅप्लिकेशन नंबर लक्षात ठेवून मुख्य पानावरील पिंट्र ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी़  (प्रतिनिधी)
 
पुन्हा संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील अपॉइंटमेंट फॉर डीएल टेस्ट या पर्यायाची निवड करा़ अपॉइंटमेंट फॉर स्लॉट बुकिंगवर क्लिक करा़ आपली माहिती तपासून ती बरोबर असल्याची खात्री करून कन्फर्म टू बुक या ऑप्शनवर क्लिक करा़ स्क्रीनवर दिनदर्शिका प्रदर्शित झाल्यावर त्यातील हिरव्या रंगाच्या तारखांमधून (उपलब्ध स्लॉट्स) आपल्या सोयीची तारीख व वेळ निवडून बुक स्लॉट या बटनावर क्लिक करा़ लगेच आपण अर्जामध्ये नमूद केलेल्या आपल्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे सिक्युरिटी कोड पाठविला जाईल़ त्यानंतर ओपन झालेल्या विंडोमधील सिक्युरिटी कोड या रिकाम्या जागेमध्ये आपल्या मोबाईलवर मिळालेला सिक्युरिटी कोड टाकून कन्फर्म टू स्लॉट बुक या ऑप्शनवर क्लिक करा़ आपली अपॉइंटमेंट बुक झाली असल्याबाबत स्क्रीनवर प्रोव्हिजनल सिसीट दिसेल. त्याची प्रिंट काढून अर्जासोबत जोडावी़ 

 

Web Title: Online Appointment Bond for Licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.