विद्यापीठ तपासणार आॅनलाइन उत्तरपत्रिका
By admin | Published: November 25, 2015 01:14 AM2015-11-25T01:14:46+5:302015-11-25T01:14:46+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या तब्बल १२ हजार ५०० उत्तरपत्रिका यंदा आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या तब्बल १२ हजार ५०० उत्तरपत्रिका यंदा आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले.
चव्हाण म्हणाले की, विद्यापीठांतर्गत गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर काही विषयांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासण्यात आल्या होत्या. त्यात कोणताही अडथळा आला नाही.
त्यामुळे यंदाच्या अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासाठी २५ ते ५० संगणक, स्कॅनरची स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यामुळे कमी कालावधीत
उत्तरपत्रिका तपासून
होतील. विद्यार्थ्यांना या
उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने पाहता येतील. पुढील काळात सर्व विद्याशाखांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)