भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे राबविण्यासाठी ऑनलाइन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:02+5:302021-03-10T04:13:02+5:30
राज्य शासनाने यापूर्वी विविध पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतली. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यासह ...
राज्य शासनाने यापूर्वी विविध पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतली. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यासह अनेक विद्यार्थी संघटनांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेऊ नयेत,अशी मागणी केली. सर्वच क्षेत्रातून याबाबत मागणी होत असल्याने अखेर महापरीक्षा पोर्टलद्वारे या पुढे परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. परंतु, पुन्हा दुसऱ्या खासगी कंपन्यांकडे परीक्षेची जबाबदारी दिली. आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे सर्व परीक्षा केवळ एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा केली.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ई-मेल व ट्विटरद्वारे एसएमएस पाठवावेत, असे आवाहन काही विद्यार्थी संघटनांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना केले आहे.