कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थांना ऑनलाईन दाखले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:31 AM2020-07-17T11:31:49+5:302020-07-17T11:32:13+5:30

विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता उर्वरित भागातील महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रातून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Online certificates to students for admission to various courses on Corona background | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थांना ऑनलाईन दाखले 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थांना ऑनलाईन दाखले 

googlenewsNext
ठळक मुद्देइयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीचा निकाल जुलै अखेरीस लागण्याची शक्यता

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले विद्यार्थ्यांना सहज मिळावेत,या उद्देशाने पुणे शहर तहसील कार्यालयाने ऑनलाईन दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता उर्वरित भागातील महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रातून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीचा निकाल जुलै अखेरीस लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात विविध दाखले सादर करावे लागतात. कोरोनामुळे प्रत्यक्ष महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रात जावून दाखले काढणे शक्य नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातर्फे ऑनलाइन पद्धतीने दाखले दिले जाणार आहेत.

पुणे शहर, पर्वती ,एरंडवणा, शिवाजी नगर ,औंध, बोपोडी, येरवडा, मुंढवा, घोरपडी, वानवडी व शहरातील सर्व पेठा हा भाग पुणे शहर तहसील कार्यालय अंतर्गत येतो. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांनी  http:// aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. तसेच अर्ज करताना किंवा संकेतस्थळाला काही अडचण असल्यास नागरी  सुविधा केंद्राच्या gil7022248@gmail.com या ईमेलवर  कागदपत्र पाठवावेत. तसेच अधिक  माहितीसाठी 9657759988 किंवा 7218851578 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

----------
१) उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे : 
१) स्वघोषणापत्र २)फोटो ३) चालू वीजबिल /चालू करपावती ४) रेशन कार्ड ५) आर्थिक वर्ष २०१९-२० चे आयटीआर/  फॉर्म १६ / तलाठी यांचा चौकशी अहवाल
-------
२) वय ,राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्यासाठी सादर करावयची कागदपत्रे :
१) स्वघोषणापत्र २)फोटो ३) १० वषार्चे रहिवासी पुरावे ४) लाभार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला ५) रेशनकार्ड /आधार कार्ड
------------
३) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्रासाठी  सादर करावे लागणारे कागदपत्र :
१) स्वघोषणापत्र २)फोटो ३)उत्पन्नाचे स्वघोषणापत्र ४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र ५) १९६७ पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे ६)  लाभार्थी आणि वडिल यांचा शाळा सोडल्याचा दाखला ७) रेशनकार्ड /आधार कार्ड/ चालू वीजबिल /चालू करपावती 
---------------
४) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी सादर करावयाची कागदपत्रे : 
१) स्वघोषणापत्र २)फोटो ३)  लाभाथ्यार्चे जात प्रमाणपत्र ४)  लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ५)  तीन वषार्चे उत्पन्नाचे दाखले ६)रेशनकार्ड /आधार कार्ड/ चालू वीजबिल  
 

Web Title: Online certificates to students for admission to various courses on Corona background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.