ऑनलाइन वर्ग सक्तीचा निर्णय रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:29+5:302021-05-09T04:12:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एफटीआयआय) मागील वर्षी विविध प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या ११० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एफटीआयआय) मागील वर्षी विविध प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या ११० विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सक्तीचे केले आहेत. उपस्थिती कमी भरली तर कारवाई होईल तसेच शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनने केली आहे.
एफटीआयआयचे विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय तसेच एफटीआयआयमधील शिक्षक आणि कर्मचारी करोनाबाधित असल्याने त्यांना उपचारासाठी झगडावे लागत आहे. घरी गेलेले अनेक विद्यार्थी दुर्गम भागात राहतात. तिथे संपर्काच्या कोणत्याही सुविधा नाहीत. कोरोनाचे संकट असताना ऑनलाइन वर्गाला उपस्थित कसे राहता येईल, असा सवाल असोसिएशनचे अध्यक्ष आदिथ साथविन याने केला आहे.
सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि दिल्ली विद्यापीठाने उपस्थितीचा नियम मागे घेतला आहे. एफटीआयआय मात्र यूजीसीच्या आदेशाचे उल्लंघन करत आहे. संस्थेचे अध्यक्ष शेखर कपूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घ्याव्यात, असे असोसिएशनने म्हटले आहे.
--------
२०२० च्या तुकडीचा केवळ फाउंडेशन कोर्स आणि कलाकारांचे मास्टर क्लास ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. उर्वरित सर्व शिक्षण संस्थेमध्ये प्रत्यक्ष दिले जाणार आहे.
- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय
--------------