तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन वर्ग भरेना, ग्रामीण विद्यार्थ्यांचा अभ्यास होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:50+5:302021-07-11T04:09:50+5:30
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्यापासून पहिली व दुसरीचे विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि ...
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्यापासून पहिली व दुसरीचे विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि अंक गणिताची ओळख चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे. सर्व साधारणपणे पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाचन लेखनासह बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार या बाबी उत्तम पध्दतीने येणे अपेक्षित आहे. परंतु, शाळा सुरू नसल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक संवाद होत नाही. त्यामुळे पालकांनीच यात लक्ष देऊन ‘घर घर पाठशाला’ हा उपक्रम राबवला पाहिजे,असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण भागात आॅनलाईन शिक्षणास अडचणी येतात.त्यातच लहान मुलांना मोबाईल समोर बसवणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्हा पालकांनाच वेळ मिळेल तेव्हा शिकवावे लागते. अक्षर ओळख व गणिताची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो.
- एम.आर.सुतार , पालक
---------------------
इंटनेट कनेक्टिव्हिटीबाबत अडचण असल्याने आॅनलाईन शिक्षणात अडथळे येतात.त्यामुळे पालक सुशिक्षत असल्यास मुलांना शिकवू शकतात.परंतु, अशिक्षित पालक मुलांना शिकवू शकत नाहीत. इंग्रजी विषयाचे ज्ञान सर्व पालकांना असतेच असे नाही. त्यामुळे इंग्रजी विषयात मुले मागे राहणाची शक्यता आहे.
- महेंद्र भालेराव , पालक
--------------------------
अभ्यास टाळण्याची मुलांकडून सांगितली जातात ही कारणे
१) माझा आत्ता अभ्यासाचा मूड नाही.
२)मी थोड्या वेळाने अभ्यास करणार आहे.
३) भाऊ अभ्यास करत नाही; मलाच अभ्यास करायला का सांगता?
४) गुरूजींनी शिकवलेले मला समजले नाही; मग मी काय अभ्यास करू ?
---------------------
प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी अक्षर ओळख वाचन, लेखन फार महत्त्वाचे आहे. सध्या शाळा सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचे ज्ञान मिळत नाही. पालकांनी वाचन, लेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार हे शिकवावे.या संकल्पना स्पष्ट झाल्या तरच विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील शिक्षण घेणे सोपे जाते.त्यामुळे पालकांनी घर घर पाठशाला हा उपक्रम राहवला पाहिजे.
- गोविंद नांदेडे, शिक्षणतज्ञ
----------------------------
‘ग्रह शाळेअंतर्गत’ग्रामीण भागात एखाद्या गल्लीतील मुलांना वाड्यात किंवा मंदीरात एकत्रित करून त्यांना मुलभूत अभ्यासक्रम शिकवले पाहिजे.तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी,गुणाकार भागाकार यासह अक्षर ओळख आणि वाचन लेखन याची ओळख करून दिली पाहिजे.
- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ञ
------------
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली - १,९०,०६१
दुसरी-१,९२,५९२
तिसरी-१,९०,१३१
चौथी-१,९०,५७५