पुरंदर हवेलीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:06+5:302021-07-18T04:09:06+5:30

या वेळी बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) माजी संचालक सतीश पाटील हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार ...

Online Competition Exam Guide for Students of Purandar Haveli | पुरंदर हवेलीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

पुरंदर हवेलीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Next

या वेळी बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) माजी संचालक सतीश पाटील हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सतीश पाटील हे राज्य सेवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत आहेत. तसेच त्यांनी यशदामध्ये डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहे. बार्टी संस्थेमध्ये यूपीएससी सेलचे संचालक म्हणून जबाबदारी त्यांनी यापूर्वी सांभाळली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून शेकडो अधिकारी आजपर्यंत घडले आहेत. केंद्रीय सेवेतील आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱ्यांसह राज्याच्या सेवेतील अनेक उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, उपायुक्त, तहसीलदार, पीएसआय व इतर दर्जाचे शेकडो अधिकारी त्यांनी घडवले आहेत. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक बारकावे, विद्यार्थ्यांनी करावयाची मानसिक आणि बौद्धिक तयारी, स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदीबाबत ते मार्गदर्शन करतील अशी माहिती उपसरपंच विद्या माणिक निंबाळकर यांनी दिली आहे.

झूम ऍपद्वारे सहभागी होण्यासाठी आवश्यक लिंक आणि पासवर्ड "ग्रामपंचायत एखतपूर मुंजवडी" या पेजवर व सरपंच कृष्णा झुरंगे आणि उपसरपंच विद्या जाधव (निंबाळकर) यांच्या फेसबुक प्रोफाईलवर देण्यात येईल. सोशल मीडियात देखील लिंक आणि पासवर्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे ग्रामसेवक अनिल जगताप यांनी सांगितले.

Web Title: Online Competition Exam Guide for Students of Purandar Haveli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.