जूनपासून आॅनलाईन बांधकाम परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:44 AM2018-05-16T01:44:54+5:302018-05-16T01:44:54+5:30

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आॅनलाईन बांधकाम प्रणाली विकसित केली आहे.

Online construction permission from June | जूनपासून आॅनलाईन बांधकाम परवानगी

जूनपासून आॅनलाईन बांधकाम परवानगी

googlenewsNext

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आॅनलाईन बांधकाम प्रणाली विकसित केली आहे. येत्या जूनपासून ही प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याने, बांधकाम परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘इज आॅफ डुर्इंग बिझनेस’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाशी संलग्न होऊन पीएमआरडीएने आॅनलाईन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीएच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. प्राधिकरणाकडून अनेक डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्राधिकरणाची हद्द सुमारे ७ हजार ३५२ चौरस किलोमीटर आहे. भौगोलिकदृष्ट्या पुणे हे देशातील तिसरे मोठे प्राधिकरण आहे. प्राधिकरणाच्या हद्दीत वेगाने विकास होत आहे.
बांधकाम परवानगी नकाशे व बँकचलन हे डिजिटल स्वाक्षरी करून प्रदान करण्यात येतील. ई-मेल व मोबाईलवर या संदर्भातील माहिती दिली जाणार आहे.
या प्रणालीमध्ये कलर-कोडिंग स्किमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वास्तुविशारदांना नकाशे बनविणे अतिशय सोपे होणार आहे.
आॅनलाईन बिल्डिंग प्लॅन
अप्रुव्हल सिस्टीमद्वारे सर्व
चलन आॅनलाईन पद्धतीने भरता येईल.
पीएमआरडीएच्या अस्तित्वात असलेला जमीन वापर (एक्झिस्टिंग लँड युझ, ईएलयू) या नवीन बांधकाम परवानगी प्रणालीला जोडण्यात आला आहे. या संगणकीय बांधकाम प्रणालीकरिता पीएमआरडीएने नवे पोर्टल विकसित केले आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर परवानगीसाठी अर्ज येत आहेत. या प्रणालीमुळे परवानगी सुलभ होणार आहे.
>संगणकीय प्रणालीचे मिळणार प्रशिक्षण
आॅनलाईन बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल सिस्टीम या प्रणालीची सर्वंकष माहिती देण्यासाठी वास्तुविशारदांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी दोनशेहून अधिक वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत. या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येत्या शनिवारी (दि. १९) यशदा येथे सकाळी १० वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Online construction permission from June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.