लग्नात दिली सावित्रीच्या लेकीने पदवीची ऑनलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:23+5:302021-07-18T04:09:23+5:30

वऱ्हाडी मंडळींनी केले कौतुक; वाल्हे येथील वैष्णवी भुजबळ हिच्या लग्नाची कथा -- नीरा : दोन जीवांच्या विवाहबंधनात गुंफण्याच्या दिवशी ...

Online degree examination of Savitri's Leki at the wedding | लग्नात दिली सावित्रीच्या लेकीने पदवीची ऑनलाईन परीक्षा

लग्नात दिली सावित्रीच्या लेकीने पदवीची ऑनलाईन परीक्षा

Next

वऱ्हाडी मंडळींनी केले कौतुक; वाल्हे येथील वैष्णवी भुजबळ हिच्या लग्नाची कथा

--

नीरा :

दोन जीवांच्या विवाहबंधनात गुंफण्याच्या दिवशी सगळी वऱ्हाडी मंडळी मंडपात हजर, हळद झाली, पंचपदी व मंगलाष्टका जवळ आल्या आन भलतेच घडले ! वधू निघाली थेट ऑनलाईन परीक्षेला. मुंडावळ्या बाजूला ठेवल्या आणि हातात मोबाईल घेऊन परीक्षेला सुरुवात झाली. हे दृश्य पाहून वऱ्हाडी मंडळींनी तोंडात बोटे घातली नसती तर नवलच ! परीक्षा संपली आन शुभमंगल सावधान होऊन डोई अक्षता पडल्या..

एखाद्या चित्रपटाची पटकथा असल्याप्रमाणे वाटणारा हा प्रसंग घडला सासवड येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात! एकीकडे बुलेट, कारमधून मोठ्या हौशेने मिरवत येणाऱ्या नववधू पाहणाऱ्या मंडळींनी स्वतःच्या लग्नात देखील शिक्षणाला अंतर न देणारी सावित्रीची लेक पहिली ! याबाबत घडले असे की, वैष्णवी अनिल भुजबळ रा. वाल्हे (ता.पुरंदर) महाविद्यालयीन शिक्षण (टी वाय बी कॉम) वाणिज्य शाखेतून आण्णा साहेब मगर कॉलज हडपसर येथे सुरु होते. शैक्षणीक वर्ष ऑनलाईन पद्धतीनेच सुरु होते आणि अचानकच वीर (ता.पुरंदर) बनकर गोठा येथील सौरभ मानसिंग बनकर यांच्याशी लग्न ठरले. लग्नादिवशीच शेवटच्या वर्षाचा कॉस्टिग (costing) विषयाची परिक्षा दुपारी ३ते ४ यावेळेत होती.

शुक्रवार दि.१६ रोजी सासवड येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळी सकाळी १० वाजताच पोहचले. साखरपुडा ११.३० ते १२.३० या नियोजित वेळेत पारपडला. हळद दुपारी १ ते २.३० पर्यंत झाली. यानंतरची वेळ ही वधुसाठी महत्वाची असते, कारण यावेळेनंतर लग्ण घटीका येईपर्यंत वधू आपला साजश्रुंगार करता असतात. याच वेळे दरम्यान वैष्णवीचा शेवटच्या वर्षाचा कॉस्टिग (costing) विषयाची परिक्षा होती. अंगाला हळद लागताच मंडवळ्या बाजूला काढून तीने थेट चारचाकी गाठली व दुपारच्या ३ ते ४ यावेळेत मोबाईलवर परिक्षेचा पेपर सोडवला. लग्नाची नियोजित वेळ लग्न ४.३० होती पण वैष्णवीने अर्ध्या तासाच्या आत साजश्रुंगार करत ५ वाजता विवाह मंडपात आली व पुरोहितांनी आता सावध सावधान..... शुभमंगलम सावधान अशी मंगलाष्टके म्हणत विवाहसोहळा पारपाडला. या अनोख्या लग्न सोहळ्याचे नातेवाईकांनी कौतुक केले.

--

कोट.

"लग्न ठरते वेळीच सासऱ्यंनी पुढील शिक्षणाची बोली केली आहे. सावित्रीच्या लेकींनी शिक्षण घेऊन चुल आणि मुलं हेच न करता शिक्षणाचा सदुपयोग आपल्या कुटुंबासस समाजासाठी कसा होईल हे सांगितले आहे. त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेलच. तसेच माहेरचे व सासरचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करेल.

-

वैष्णवी अनिल भुजबळ

नववधू

Web Title: Online degree examination of Savitri's Leki at the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.