अलंकापुरीत ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:44+5:302021-04-22T04:09:44+5:30
याप्रसंगी संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त व श्री संत ...
याप्रसंगी संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त व श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
दरम्यान पारायण शुभारंभाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या शुभहस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमा व ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पूजनाने संपन्न झाला. या वेळी आपल्या मनोगतामध्ये दीपक मुंगसे, प्रकाश काळे, डॉ. दीपक पाटील, अजित वडगावकर व सुरेश वडगावकर यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे कौतुक करत कोरोनाच्या काळात या पारायणाचा स्वतःबरोबर समाजाचा व जगाचाही फायदा होईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सांस्कृतिक समितीप्रमुख प्रशांत सोनवणे, सोमनाथ आल्हाट, अरविंद शिंदे व प्रकाश भागवत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय उदमले तर, प्रदीप काळे यांनी आभार मानले.