शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:13+5:302021-09-07T04:13:13+5:30
५० वयापुढील व्यक्ती व काही सेवानिवृत्त झालेल्या व्यक्ती ऑनलाईन स्नेहमेळाव्यासाठी प्रथमच मोठ्या संख्येने उपस्थित झाले. माजी विद्यार्थ्यांचे परस्परांशी ...
५० वयापुढील व्यक्ती व काही सेवानिवृत्त झालेल्या व्यक्ती ऑनलाईन स्नेहमेळाव्यासाठी प्रथमच मोठ्या संख्येने उपस्थित झाले. माजी विद्यार्थ्यांचे परस्परांशी स्नेहभाव वाढविण्यासाठी सभासद असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सूचनेचा विचार करून व कोरोनाच्या काळातील परिस्थिती पाहून स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.
एकूण तीन टप्प्यांत मेळावा घेण्यात आला. झूम ऑनलाईन मेळाव्यात बाळासाहेब काकडे, एस. आर. माने, बाळकृष्ण कुलकर्णी, दिनकर पेंडसे, शंकरराव रोडे, मुरलीधर पवार, दत्तात्रय होजगे सर, विजय वाडेकर, प्रल्हाद बागलाणे, मनोहर जाधव माळी, चंद्रकांत सावंत, बबनराव गिलबिले, बबनराव चांभारे, सुनील पवार, मोहन कोळपकर, शोभाताई जाधव (नाईक), सरला बोरगावकर (क्षीरसागर), शुभांगी शौरी (प्रभाकर), रेणुका शर्मा (प्रभाकर), रोहिणी कर्पे (कहाणे), सुदाम मराडे, गुलाब वाडेकर, बळीराम वाडेकर, रामचंद्र साबळे, दगडू बाबूराव शिंदे, तेजपाल शहा, रजनी अकलूजकर (काजळे), राजेंद्र काजळे उपस्थित होते.