आळंदीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:34+5:302021-06-17T04:08:34+5:30

कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसल्या कारणाने गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड चालू राहावे, मुलांचे शैक्षणिक ...

Online learning lessons for students in Alandi | आळंदीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे

आळंदीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे

Next

कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसल्या कारणाने गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड चालू राहावे, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट टिम्स, गुगल मीट, झूम या ॲपद्वारे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी दिली. ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पुस्तके वितरित करण्यात आली. याप्रसंगी प्रेसिडेंट अविनाश कुलकर्णी, अर्जुन बाळासाहेब रावडे, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त एल.जी. घुंडरे, मुख्याध्यापक दीपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, प्रशांत सोनवणे, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

दरम्यान, प्रशालेस विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अविनाश कुलकर्णी यांनी संगणक व वेब कॅमेरा देऊन प्रशालेस मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप काळे, सूत्रसंचालन वर्षा काळे तर वैशाली शेळके यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशा कांबळे, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण, अतुल भांडवलकर, ग्रंथपाल उमेश कुलकर्णी आदींचे सहकार्य लाभले.

--

फोटो क्रमांक : १६ आळंदी : विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे

फोटो ओळ : आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाला संगणक भेट देताना पदाधिकारी

Web Title: Online learning lessons for students in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.