‘सेक्स टॉईज’चा ऑनलाईन बाजार जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:52+5:302020-12-04T04:27:52+5:30
लक्ष्मण मोरे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘सेक्स टॉईज’चा ऑनलाईन बाजार जोमात असून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. ...
लक्ष्मण मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘सेक्स टॉईज’चा ऑनलाईन बाजार जोमात असून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दिल्ली आणि उत्तर भारतातील काही शहरांमधून हा माल पुण्यात पाठविला जात असून कुरिअर कंपन्यांमार्फत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. ही लैंगिक खेळणी खरेदी करणाऱ्यांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण पुरुषांचे असून महिलांकडूनही लक्षणीय खरेदी होत आहे.
एकीकडे सरकार ऑनलाईन पोर्नोग्राफीवर बंदी घालत आहे. परंतु, ही संकतेस्थळे काही ना काही शक्कल लढवून चालवली जातात. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांचा वापर करून पॉर्न साहित्य ग्राहकांपर्यंत पोचविले जाते. ‘पॉर्न कंटेंट’ पाहणाऱ्यांच्या मोबाईलवर ‘सेक्स टॉईज’ विकणाऱ्यांकडून संदेश पाठविले जातात. यात विविध प्रकारच्या लैंगिक खेळण्यांचा समावेश असतो. साहित्य विकणाऱ्या वेबसाईटचे मोबाईल क्रमांक पाठवले जातात.
वास्तविक भारतात अशा प्रकारचे लिखित अथवा वस्तूरुप साहित्य विकण्यास बंदी आहे. त्याचे प्रदर्शन, जाहिरात यावरही कायद्याने बंदी आहे. परंतु, तरीही विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून जाहिराती केल्या जात आहेत आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो आहे. संपर्काची साधने पूर्णपणे वैयक्तिक असल्याने हे साहित्य सहज उपलब्ध होत आहे. यावर सध्यातरी पोलीस आणि शासकीय यंत्रणांचे कोणतेही नियंत्रण नाही. हे साहित्य विकणाऱ्या घटकांवर कोणत्या कायद्याखाली कारवाई करायची याबाबत संदिग्धता आहे. कारण, या वस्तूंच्या वैयक्तिक वापराला बंदी आल्याचे कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही.
चौकट
१. ‘सेक्स टॉईज’ घरात बाळगणे गुन्हा नाही. या वस्तूंचा वापर जोपर्यंत खासगी आहे तोवर गुन्हा ठरत नाही. मात्र सार्वजनिक प्रदर्शन हा गुन्हा ठरतो.
------