पुण्यात सेक्स टॉईजचा ऑनलाईन बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:54+5:302020-12-04T04:27:54+5:30
स्त्री आणि पुरुषांच्या विविध अवयवांच्या प्रतिकृतींची विक्री ऑनलाईन केली जात आहे. यासाठी रबर, प्लास्टिक, सिलिकॉन आदींचा उपयोग केला जातो. ...
स्त्री आणि पुरुषांच्या विविध अवयवांच्या प्रतिकृतींची विक्री ऑनलाईन केली जात आहे. यासाठी रबर, प्लास्टिक, सिलिकॉन आदींचा उपयोग केला जातो. स्त्री-पुरुषांच्या नग्नावस्थेतील विविध आकारांच्या बाहुल्यांना (डॉल) मोठी मागणी आहे.
येतात कुठून?
या साहित्याची आयात मुख्यत्वे चीनमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे अशा ‘कॉस्मोपॉलिटन मेट्रो सिटी’तले लोक या वस्तुंची ऑनलाईन खरेदी करत आहेत. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सध्या तरी नाही. या साहित्यांचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचे सर्वेक्षण केले आहे. लोकांच्या लैंगिक गरजा, आवड यानुसार बाजारात विविध ‘सेक्स प्रॉडक्ट्स’ आणली जात आहेत. भारतातील २०२० मधील ‘सेक्स टॉईज’चा व्यवसाय हा साडेआठशे कोटींच्यापुढे असल्याचे सांगितले जाते.
तक्रार करता येते
‘सेक्स टॉईज’च्या ऑनलाईन विक्रीबाबत तक्रार नोंदवायची असल्यास थेट फोन व ईमेलद्वारे माहिती व प्रसारण मंत्रालय किंवा सायबर गुन्हे पोलिसांशी संपर्क साधून तक्रार देता येते.